शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अहवालानंतर बीआरटीला हिरवा कंदील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:08 IST

सेफ्टी आॅडिट अभावी दापोडी ते निगडी हा बीआरटी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सेफ्टी आॅडिटनंतर बीआरटी मार्ग सुरू केला जाणार आहे. सुरक्षा उपाययोजनांची पाहणी पदाधिकारी आणि अधिका-यांनी मंगळवारी केली.

पिंपरी - सेफ्टी आॅडिट अभावी दापोडी ते निगडी हा बीआरटी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सेफ्टी आॅडिटनंतर बीआरटी मार्ग सुरू केला जाणार आहे. सुरक्षा उपाययोजनांची पाहणी पदाधिकारी आणि अधिका-यांनी मंगळवारी केली. या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता तपासून अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊनच बीआरटी मार्ग सुरू करावा. या मार्गावर नवीन गाड्या असाव्यात, अशा सूचना पदाधिकाºयांनी प्रशासनास केल्या आहेत.गेल्या १० वर्षांपासून निगडी ते दापोडी या बीआरटी मार्गाचे काम रखडले होते. या मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी मार्ग आणि सर्वसामान्य वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आहे. त्यामुळे एकाच मार्गावर अनेक प्रकारची वाहतूक असल्याने बीआरटी सुरू करणे अपघातास निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे या मार्गावरील बीआरटीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. श्रावण हर्डीकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे.आयआयटीच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना बीआरटी मार्गावर करण्यात आल्या आहेत. सेफ्टी आॅडिटसाठी मार्ग सज्ज झाला आहे. या मार्गाची पाहणी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता जुंधारे, बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजणे आदी उपस्थित होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौक आणि भक्ती-शक्ती चौक ते पिंपरीपर्यंतच्या बीआरटी मार्गाची पाहणी केली.वीस मिनिटांत प्रवासदापोडी ते निगडी या मार्गासाठी सध्या ३५ मिनिटांचा कालावधी लागतो. बीआरटीमुळे या वेळेत कपात होणार आहे. सुमारे २० मिनिटांत बस निगडीला पोहोचणार आहे. तसेच दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मार्गात बदल केला आहे. या मार्गाचे काम सुरू असेपर्यंत बीआरटी जुन्या मार्गाने धावेल. हे काम पूर्ण होताच बीआरटी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.महापौर : अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यापिंपरीतील बॅँक आॅफ इंडियासमोरील बस स्टॉपमध्ये बस थांबताच महापौरांनी बसमधून स्टॉपवर उतरतानाचे अंतर कमी आहे, ही बाब लक्षात आणून दिली. यातून अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. त्यानंतर एम्पायर इस्टेट येथील थांब्यावर बस थांबल्यानंतर रस्ता प्रवासी रस्ता कसा ओलांडणार, असा प्रश्न पक्षनेत्यांनी केला. त्यावर बसमधून उतरल्यानंतर प्रवासी पुढे येऊन बीआरटी लेनच्या कडेला असणारे एक बटन दाबेल आणि त्यानंतर समोरील रस्त्यावरील वाहतूक थांबेल. त्यानंतर प्रवासी रस्ता ओलांडू शकतील. तसेच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे.वळणावर गोलाकार आरसे४मार्गावर आकुर्डी बजाज आॅटो, काळभोरनगर येथे अंडरपास आहेत. त्या ठिकाणी रस्ता ओलांडणाºया वाहनांस बीआरटी मार्गावरून वाहन येत आहे, याची माहिती देण्यासाठी वळणावर गोलाकार आरसे लावण्यात आले आहेत, याबाबतची सूचना आयआयटी पवई यांनी केली होती. त्याची उपययोजना केली आहे.चौकात प्रवाशांना स्वतंत्र मार्ग४डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह पुढील सर्व महत्त्वाच्या चौकांतील बसथांब्यावरून चौकात येण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र मार्ग केला आहे. तेथून चौकात येऊन प्रवासी झेब्रा क्रॉसिंगचा आधार घेऊन रस्ता ओलांडू शकणार आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही.वाहने थांबण्यासाठी पांढरे पट्टे४ग्रेड सेपरेटरमधून बीआरटी मार्ग ओलांडणे, तसेच सर्वसामान्य वाहनांसाठी केलेल्या मार्गातून बीआरटी मार्ग ओलांडून ग्रेड सेपरेटर मार्गावर जाण्यासाठी मर्ज इन आणि आऊट येथे वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी पांढरे पट्टे मारलेले आहेत. त्यामुळे मार्गिकेवर येताच वाहनाचा वेग कमी होणार आहे. तसेच मार्गिकेवर हा रूट फक्त बीआरटीसाठी आहे, असे सूचनाफलकही लावल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.एक मिनिटाला एक बस४दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर विविध मार्गांवरील २३६ बसगाड्या धावणार असून, त्यांच्या पुण्याच्या विविध भागात जाणाºया आणि पुण्यावरून पिंपरी-चिंचवड आणि इतर भागात जाणाºया दिवसाला अडीच हजार फेºया होणार आहेत. त्यामुळे एका मिनिटाला एक बस या मार्गावरून धावणार आहे.पदाधिकाºयांनी केलेल्या सूचना४बस आणि स्टॉप यांमधील अंतर तपासावे.४नवीन बसगाड्याच मार्गावर पाठवाव्यात.४बीआरटीसाठी एकच तिकीट असावे.४मार्गिकेवरील अंडरपास येथील आरसे मोठे असावेत.४ पूर्ण लेनचे काम करावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड