शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनंतर सास-याचा खून, तपासात झाले स्पष्ट, आरोपीस सापळा रचून उत्तर प्रदेशात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:57 IST

पिंपरी येथील एमआयडीसी कारखान्यात काम करणा-याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकला. त्यानंतर उत्तर प्रदेशात जाऊन सास-याचाही खून केल्याचा प्रकार चौकशीतून उजेडात आला

पिंपरी : येथील एमआयडीसी कारखान्यात काम करणा-याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकला. त्यानंतर उत्तर प्रदेशात जाऊन सास-याचाही खून केल्याचा प्रकार चौकशीतून उजेडात आला आहे. पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून विनोद जैस्वार (वय ३०) या आरोपीला अटक केली आहे.भोसरीतील एका नाल्यामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याचे १ आॅक्टोबरला आढळले होते. पाच दिवसांपूर्वी या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर गुन्हाच्या तपासाला वेग आला.घरातील सततच्या भांडणांना कंटाळून पतीने या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा खून केला होता. पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून तो त्याने भावाच्या मदतीने मगर स्टेडिअममागील नाल्यात टाकला होता. पत्नीच्या हत्येनंतर आपल्या लहान मुलाला घेऊन जैस्वार उत्तर प्रदेशला रवाना झाला होता. मुलाला बहिणीकडे सोपवून त्याने थेट बायकोचे माहेर गाठले. तेथे सासरे खजानसिंग मुन्नर गौतम (वय ७०) यांच्या डोक्यात घाव घालून त्यांनाही ठार मारले.महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश व इतर ठिकाणीविनोदच्या मागावर पथके पाठविली होती. त्या वेळी विनोद राजन जैसवार याला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावर सापळा रचून त्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा