शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:15 IST

गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती.

- मंगेश पांडे पिंपरी : गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती. कारवाईला विरोध केल्याने अतिक्रमणधारक व अतिक्रमण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला. एवढा मोठा गोंधळ झाला असतानाही येथील अतिक्रमणे ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे या अतिक्रमणाला पाठबळ कुणाचे आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ८ ते १० जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर तरी येथील अतिक्रमणे हटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी झालेल्या कारवाईनंतर लगेचच येथील अतिक्रमणे ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळत आहेत.अतिक्रमण रोखण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. यासाठी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केले असून, त्यांच्यामार्फत कारवाई केली जाते. पूर्वी प्रभाग कार्यालयनिहाय ही पथके स्थापन करून कारवाई केली जात होती. आता मात्र, महापालिका मुख्यालयातून शहरातील अतिक्रमण कारवाईचे कामकाज पाहिले जात आहे. ज्या भागात कारवाई असेल त्या ठिकाणी मुख्यालयात पथक पाठवितात. कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, किमान १५ मजूर, बुलडोझर, टेम्पो यासह कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. एका ठिकाणी कारवाईसाठी एवढी यंत्रणा वापरली जाते. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई केली जाते, त्या ठिकाणी काही तासांतच पुन्हा अतिक्रमण थाटले जाते. अतिक्रमण कारवाईचा खरेच उपयोग होतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.>काही तासांतच पुन्हा थाटली दुकानेरहदारीस अडथळा ठरणाºया, तसेच महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा वापरली जाते. मात्र, कारवाईसाठी आलेले पथक कारवाई करून गेल्यानंतर पुन्हा काही तासांतच त्याच ठिकाणी अतिक्रमणे थाटलेली पाहायला मिळतात. त्यामुळे कारवाईचा देखावा कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अतिक्रमणामुळे अपघाताचा धोकापदपथावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका होऊ असतो. गुरुवारी कारवाईच्या वेळी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांची दमछाक झाली. कारवाईसाठी काही काळ नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.दबावाने अधिकाºयाची कोंडीअतिक्रमण कारवाईसाठी पथक आल्यानंतर अथवा कधी कधी तर संबंधित ठिकाणी जाण्यापूर्वीच पथकातील अधिकाऱ्यांना राजकीय पदाधिकाºयांचे फोन येतात. ‘आपला कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी कारवाई करू नका’ असा आदेश सोडला जातो. त्यामुळे पथकातील अधिकाºयांचीही कोंडी होते.