शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पिंपरीत वादळीचर्चेनंतर वाहनतळ धोरण मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:22 IST

आरक्षणांच्या जागेवरील वाहनतळाच्या दरांमध्ये पंचवीस टक्के कपातीची उपसूचना देऊन विषय मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देशहराची लोकसंख्या सुमारे एकवीस लाख असून, वाहनसंख्या सोळा लाख वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक गंभीर प्रश्न

पिंपरी : शहरातील वाहनतळ आरक्षणे विकसित करा मगच धोरण राबवा, धोरण राबविताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, मॉल मंगलकार्यालयांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात, सर्व शहरात एकाचवेळी धोरण न राबविता टप्याटप्याने राबवा, अशी प्रश्नांची सरबत्ती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी केली. आरक्षणांच्या जागेवरील वाहनतळाच्या दरांमध्ये पंचवीस टक्के कपातीची उपसूचना देऊन विषय मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. शहराची लोकसंख्या सुमारे एकवीस लाख असून, वाहनसंख्या सोळा लाख आहे. हे नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनाने ये-जा करत असतात. वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक गंभीर प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट वाहतूक करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाहनतळाचे धोरण तयार केले आहे. त्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर या शहराच्या पार्किंग पॉलिसींचा अभ्यास केला आहे. त्याचे संगणकीय सादरीकरण महापालिका लोकप्रतिनिधींसमोर केले होते. त्यास विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत या धोरणाचे काय होणार याबाबत उत्सुकता होती. विरोधक सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनास धारेवर धरतील अशी चिन्हे होती. मात्र, शहरातील पार्किंग व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा यावर चर्चा झाली. समस्यांचा पाढा वाचला, सूचना केल्या. उपसूचनेसह हा विषय मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे म्हणाले, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार नाही, आरक्षणे विकसित करणार नाही आणि धोरण राबविणार ही बाब चुकीची आहे. धोरण ही गरज असली तरी वास्तव परिस्थिती काय याचाही अभ्यास करायला हवी. अगोदरच लोक महागाईला वैतागले आहेत. त्यात आणखी बोजा कशासाठी. विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, धोरण अवलंबताना आपण परदेशातील दिवा स्वप्न दाखविले आहे. बरोबरी करायला पन्नास वर्षे लागतील. आरक्षणे ताब्यात घेऊनच विकसित करून धोरण राबवावे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शहराचे नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे शिस्त लागण्याच्या दृष्टीने धोरण आवश्यक आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळावे, हा उद्देश नाही. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हे धोरण पूरक ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर