शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खिळेमुक्त झाडे करण्यासाठी प्रशासनाचा कारवाईचा बडगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:14 IST

कुठेही झाडांवर जाहिरात किंवा बॅनर लावण्यासाठी खिळे ठोकताना दिसला तर त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआगामी काळात खिळेमुक्त झाडे उपक्रम आणखी तीव्र करण्यात येणार

रावेत : खिळेमुक्त झाडे ह्या अभियानात प्राधिकरण आघाडीवर आहे. गेले ११ आठवडे ही मोहीम या परिसरात राबवली जात आहे. आयुक्तांनी झाडावर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहेत. 'अ' प्रभागाचे सहायक आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे आणि आरोग्य निरीक्षक बापूसाहेब गायकवाड यांनी झाडांवर खिळे आणि बॅनर लावल्याबद्दल शहर विद्रुपीकरण आणि अस्वच्छता या नियमानुसार जाहिरात करणाऱ्या दुकानदारांवर प्रत्येकी २०० रुपये दंड आकारत कारवाई केली. यापूढील काळात जास्तीत जास्त दंड आकारण्यात येईल असेही सुनाविण्यात आले. कुठेही झाडांवर जाहिरात किंवा बॅनर लावण्यासाठी खिळे ठोकताना दिसला तर त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल आणि नागरिकांनी सुद्धा झाडांवर असलेल्या जाहिरातींचे फोटो काढून प्रभागामध्ये दयावेत. काही दुकानदारांना आणि नागरिकांना समज देण्यात आली. सामाजिक संस्थांनी राबवलेल्या खिळेमुक्त झाडे या उपक्रमाअंतर्गत सर्व झाडांना प्रथम खिळेमुक्त करून त्यानंतर त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्यांच्या भोवती आळे करण्यात येते. आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.     

टॅग्स :Puneपुणे