शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

‘गॅमन’ला टाका काळ्या यादीत

By admin | Updated: October 21, 2015 00:53 IST

नगरसेवकांनी खंडणी मागितल्याचा आरोप गॅमन इंडियाने केल्याचा विषय सर्वसाधारण सभेत गाजला. खंडणी या शब्दावरून सभा गाजली. वेळेवर काम न करणाऱ्या आणि नगरसेवकांची

पिंपरी : नगरसेवकांनी खंडणी मागितल्याचा आरोप गॅमन इंडियाने केल्याचा विषय सर्वसाधारण सभेत गाजला. खंडणी या शब्दावरून सभा गाजली. वेळेवर काम न करणाऱ्या आणि नगरसेवकांची आणि महापालिकेची बदनामी करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी. काळ्या यादीत टाकावे, चुकीच्या कामास मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सभा तहकुबीची मागणी केली. संबंधित ठेकेदारांवर कारवाई आणि काळ्या यादीत टाकावे, असे आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी आयुक्तांना दिले. येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत सभा तहकूब केली आहे.प्रारंभी मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. नंतर सुरू झालेल्या सभेत नगरसेवकांनी एम्पायर इस्टेट पुलाचे काम करणाऱ्या गॅमन इंडियाकडे ऐंशी लाखांची खंडणी मागितली, असा आरोप कंपनीच्या एका अधिकाऱ्याने केल्याचे पडसाद सभेत उमटले. ‘खंडणी’ या शब्दावरून वादंग झाले. काही नगरसेवकांनी शिव्याची लाखोली वाहिली. भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नगरसेवकांनी खंडणी मागितल्याचा आरोप गॅमन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे नगरसेवकांची प्रतिमा आणि महापालिकेची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. जर खंडणी मागितली असेल, तर त्याबद्दल कायदेशीर कारवाई अपेक्षित होती. काही ठेकेदारांचे धाडस वाढले आहे.’’अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, दत्ता साने यांनी आक्रमकपणे आपले मत मांडले. साने म्हणाले, ‘‘ जर कोणी नगरसेवकांना बदनाम करीत असेल, तर त्याने खंडणी मागणाऱ्यांची नावे जाहीर करावी. अन्यथा, भर चौकात मारले जाईल.’’ (प्रतिनिधी)एम्पायर इस्टेट पूल : समितीद्वारे चौकशी कराशिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘चिंचवड स्टेशन एम्पायर इस्टेट पुलाचे काम करणाऱ्या ठेकदाराने नगरसेवकांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. यावरून सर्वसाधारण सभा गाजली. पुलाच्या कामाची आणि खंडणी प्रकाराची एकसदस्यीय समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी करावी. कोणी नगरसेवकाने संबंधित ठेकेदाराकडे खंडणी मागितली असेल, तर त्या ठेकेदाराने फौजदारी दाखल करणे गरजेचे होते. गुंडगिरीची भाषा चुकीची आहे. तसेच जागा ताब्यात नसताना प्रकल्पाची निविदा अधिकाऱ्यांनी कशी काढली, याचीही चौकशी व्हायला हवी. वास्तविक वेळेवर काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला भाववाढ देणे, हाही एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. यापूर्वी महापालिकेत जकातचोरीची एक चौकड कार्यरत होती. नगरसेवकांवर आरोप केले जाते. मात्र, अधिकाऱ्यांना दोषी धरण्याचे धाडस कोणी करीत नाही. आजची सभा तहकूब करण्यात आली. सभेचा वापर दमदाटीसाठी करणे चुकीचे आहे. जर कोणी खंडणी मागितली असेल, त्याचे नाव जाहीर करायला हवे.’’अधिकारी कोण?संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम होत आहे. त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करायला हवी. निविदेतील अटी-शर्तीबद्दल सभागृहाला माहिती द्यावी, या मागणीवर सहशहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘आठ कोटींची ही निविदा होती. तिची मुदत संपली आहे. मुदतवाढीचा कालावधीही संपला आहे. याबाबत त्या ठेकेदाराला वारंवार नोटिसा दिल्या आहेत. त्याचे काम समाधानकारक नाही.’’ त्यावर कोणाच्या कारकिर्दीत ही निविदा मंजूर केली, असा प्रश्न साने यांनी केला. त्यावर या वेळी आयुक्त आशिष शर्मा, शहर अभियंता एकनाथ उगीले, अधिकारी श्रीकांत सवणे होते, असे उत्तर पाटील यांनी दिले. वीस टक्के जागा ताब्यात नसताना निविदा काढलीच कशी, असा प्रश्न साने यांनी केला. अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. निविदेतील अटी-शर्तीनुसार काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत जोपर्यंत टाकले जात नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज सुरू राहू देणार नाही, अशी भूमिका घेतली. पाटील व सवणे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कार्यकारी अभियंत्याचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. वातावरण काही काळ गंभीर झाले. त्यानंतर महापौरांनी सभागृह नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, तसेच काळ्या यादीत टाकावे, असे आदेश महापौरांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिले. ठेकेदाराचा निषेध करून, ही सभा १६ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.