शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडबाधितांवर कारवाई? प्राधिकरण प्रशासनाकडून तयारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:07 IST

रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

रावेत : रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोडबाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. पर्यायी मार्गाने रिंगरोड वळविण्यासाठी घरबचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली. जुलै महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांनी रिंगरोडवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी ही केली होती.चिंचवडेनगर, बिजलीनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कार्यवाहीची जोरदार तयारी प्रशासनाने केलीअसून, येत्या १३ आणि १४ तारखेला रिंगरोडबाधितांवर कारवाईहोण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़ कारवाईमुळे अनेकांना बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे.सत्ताधारी भाजपा सरकारने जनतेला दिलेला प्राधिकरणातील अनियमित घरे नियमित करण्याचा शब्द पाळला पाहिजे, खूप विश्वासाने यांना या जनतेने निवडून दिले आहे. परंतु हेही सरकार जाणीवपूर्वक रिंगरोड सह या प्रश्नाचे राजकारण करत आहे. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. सत्तेमधील काही लोकांचा या जागेवर डोळा असल्यानेच हा प्रश्न सोडविला जात नाही. एकीकडे घरे वाचवण्याची आश्वासने द्यायची दुसरीकडे कारवाया चालू ठेवायच्या हा जनतेचा खूप मोठा घात आहे़ जर प्रशासनाने कारवाई सुरू केली तर प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणार आहोत, जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल.- धनाजी येळकर पाटील, समन्वयक, घरबचाव संघर्ष समितीउद्या होणारी संभ्याव्य कारवाई घटनेच्या मूलभूत गरजांना धरून असणारी नाही. यामुळे सरळ सरळ महाराष्ट्र शासनाच्या प्रारूप नियमावलीची पायमल्ली होणार आहे. प्राधिकरण प्रशासनाने तज्ज्ञ, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कारवाईचा विचार करणे योग्य राहील. घटनेचा अनादर करून बांधकामे पाडणे नियमांना धरूननाही, अशा अनागोंदी कारभारामुळे गरीब आणि सामान्य कुटुंबांना त्याची जास्त झळ पोहचत आहे. - विजय पाटील, समन्वयक,घरबचाव संघर्ष समिती

टॅग्स :Puneपुणे