शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राजकीय फलकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 02:41 IST

लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातील सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत.

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातील सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्यानंतर महापालिकेने आचारसंहिता कक्षही सुरू केला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील फलकवाल्यांची बैठक घेऊन राजकीय फलक तातडीने हटवावेत, अशा सूचनाही दिला होत्या. तसेच निवडणूक विभागास आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मालमत्ता व आवारातील राजकीय नेत्यांचे फोटो, बॅनर्स काढण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी महापालिका भवनातील महापौर, पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील फोटो काढले होते. तसेच महापालिकेच्या महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनातील राजकीय छायाचित्रे झाकली आहेत.७२ तासांचा अवधी : मुदतीनंतर कारवाईपिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्स हटविण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे. तर खासगी जागेत लावलेले फ्लेक्स हटविण्यासाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. शहराच्या विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांत महापालिकेने सहाशे दहा राजकीय फ्लेक्सवर कारवाई केली आहे. आचारसंहिता काळात राजकीय फलक लावायचे असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड