शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

डास उत्पत्तीस प्रोत्साहन दिल्याने महामेट्रोवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:49 IST

शहरात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोचे काम सुरू.

ठळक मुद्देपंधरा हजारांचा दंड : 

पिंपरी :   शहरात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोचे काम सुरू आहे. महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कॉस्टींग यार्डमधील लेंबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने  ठेकेदार  एनसीसी या कंपनीस पंधरा हजार रूपयांचा दंड आकारला आहे.पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट अशा साडेसात किलोमीटर अंतरावर काम सुरू आहे. मेट्रो स्पॅनसाठी सेगमेंटची निर्मिती नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कॉस्टींग यार्ड येथे केली जात आहे. याच ठिकाणी मेट्रोचा लेंबर कॅम्प आहे. त्या ठिकाणी तपासणी केली असता डास उत्पत्ती होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागास आढळून आले.त्यामुळे पालिकेच्या पथकाने महामेट्रोच्या एनसीसी या ठेकेदारास पंधरा हजारांचा दंड केला आहे. डास उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सक्त बजावले आहे. याच कॉस्टींग यार्डमधून राडारोडा पवना नदी पात्रात टाकला जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पालिकेने व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने महामेट्रोला नोटीस बजावली होती. त्यामुळे महामेट्रोने तातडीने नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला होता. तसेच, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. या प्रकारची तपासणी मोहिम पालिकेकडून सुरू आहे. बांधकाम व हॉटेल व्यावसायिकांना या पूर्वी पाच हजारांचा दंड केला आहे.मेट्रोच्या साहित्यावर पावसाचे पाणी साचून दापोडी ते चिंचवडपर्यंत रस्त्यावर मेट्रोचे मोठ्या प्रमाणात साहित्य पडून आहे. बॅरिकेट्स, लोखंडी सांगाडे, फ्रेम, खांब, साहित्य ठिकठिकाणी अनेक महिन्यांपासून  पडून आहेत. तसेच, मेट्रोने अनेक ठिकाणी खड्डे घेतले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होत आहे. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशी, वाहनचालक आणि मेट्रोच्या कामगारांना डास चावून विविध आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात  आरोग्य विभागाने तपासणी मोहिम राबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.डॉ. अनिल रॉय म्हणाले, ह्यह्यडासोत्पतीची ठिकाणे शोधून काढावीत, यासाठी प्रभातस्तीरीय आरोग्य विभागास सूचना केल्या आहेत. त्यानुसार तपासणी मोहीम सुरू आहे.ह्णह्ण 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो