शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

त्या’ आरोपींचा जामीन होणार रद्द; बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 21:54 IST

जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली.

पिंपरी : गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि. १५) उघडकीस आला. अशा पद्धतीने जामीन मिळविलेल्या आरोपींवर देखील पुन्हा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्याबाबत माहिती देताना कृष्ण प्रकाश म्हणाले, गंभीर गुन्ह्यात अटक आरोपींना जामीन करून देण्यासाठी अटक केलेले आरोपी हे बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे, अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात. जे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्टाच्या कामासाठी हजर राहणार नाहीत, अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करून कोर्टात जामीनदार म्हणून हजर केले जात असे. त्याआधारे आरोपींना कोर्टातून जामिनावर सोडले जात असत. आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला.

जामिनावर सुटलेल्या आरोपींचा घेणार शोधदोन्ही गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी कोणत्या न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच किती आरोपींना अशा पद्धतीने जामीन मिळाला, त्याचाही शोध घेण्यात येईल. अशा जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या विरोधात पुन्हा गुन्हे दाखल केले जातील, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

आधार कार्डची पडताळणी व्हावीमहसूल विभागाप्रमाणेच न्यायालय व पोलिसांकडे आधारकार्डची पडताळणी करण्याची यंत्रणा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक झाल्यास अशा पद्धतीने बनावट कागदपत्रे सादर करण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही कृष्ण प्रकाश म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक