शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोमाटणे फाटा येथील खुनी हल्ल्यातील आरोपीला १६ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:33 IST

सोमाटणे फाटा येथे केला होता हल्ला

ठळक मुद्देखंडणी - दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात एक जण गंभीर जखमी झाला. मावळ तालुक्यातील परंदवडी- सोमाटणे रस्त्यावर शनिवारी (दि. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणातील आरोपीला १६ तासांत अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी-दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. केतन पोकळे (वय २२, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरापीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य विलास गराडे व रोहन दिनकर गराडे हे दोघे दुचाकीवरून एका कंपनीमध्ये चहा घेऊन जात होते. त्यावेळी प्रसाद उर्फ परशा टेंभेकर (रा. उर्से), आकाश साळुंखे (रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा), केतन पोकळे (रा. सोमाटणे फाटा), हर्षद भोकरे (रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) व इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा सात जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी रोहन गराडे याला पूर्वीच्या भांडण्याच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार करून, लाथा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी आदित्य गराडे याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  होता. खुनी हल्ल्यातील या फरार आरोपींचा तळेगाव दाभाडे परिसरात शोध घेत असताना आरोपी केतन पोकळे हा साईनगर, साई मंदिराचे समोर, देहुरोड येथे थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. साथीदारांसह त्याने खुनी हल्ला केल्याची कबुली दिली. खंडणी-दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, अनिकेत हिवरकर पोलीस कर्मचारी अजय भोसले, उमेश पुलगम, निशांत काळे, किरण काटकर, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, सागर शेडगे, आशिष बनकर व गणेश कोकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकMurderखून