शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद ;युनिट तीनची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:01 IST

महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या आरोपीला आळंदी येथून घेतले ताब्यात

पिंपरी : आपले वास्तव्य सातत्याने बदलून गेल्या नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.नारायण माणिकराव गाडेकर पाटील उर्फ नारायण यशवंत पाटील (वय ३०, रा. पदमावती रोड, आळंदी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०११ पासून फरार होता. त्याला २०१८ मध्ये न्यायालयाने फरार घोषित केले. आरोपी याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात २०११ मध्ये घरफोडी, जबरी चोरीचे तीन आणि २००८ मध्ये फसवणुकीचा एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. तेव्हापासून तो वारंवार आपले अस्तित्व बदलून पोलिसांना गुगारा देत होता. आरोपी आळंदी येथे मंगळवारी (दि.१८) येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सायंकाळी पाचच्या सुमारास ताब्यात घेतले. गुन्हे केले असल्याचे त्याने चौकशी दरम्यान कबूल केले. पोलिसांनी आरोपी याला अटक करून पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले. त्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस आरोपीच्या मागावर होते. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याची माहिती घेतली. पद्मावती झोपडपट्टी, गाढवे वस्ती आणि इतर काही ठिकाणी त्याचा शोध घेतला. गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी गंगाधर चव्हाण, विठ्ठल सानप, हजरत पठाण, सचिन मोरे, यदु आढारी, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, प्रमोद ढाकणे, नाथा केकान, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक