शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:05 IST

पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी

पिंपळे गुरव : नाशिक फाटा ते वाकडदरम्यान नागरिकांसाठी जलद वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला बीआरटीएस मार्ग वाहनांच्या अतिवेगामुळे पादचाऱ्यांच्या मुळावर उठला आहे. पिंपळे गुरवमधील जवळकरनगर ते काशिद पार्कदरम्यान असलेल्या जवळकरनगर, कल्पतरू चौकात रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात घडत आहेत. परिणामी नागरिकांना कायमचे अपंगत्व, तसेच जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जवळकरनगर, कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर तयार करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील हा महत्त्वाचा बीआरटीएस रस्ता पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथून जातो. या परिसरात नागरिकांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जवळकरनगरकडून काशिद पार्ककडे जाताना जवळकरनगर, कल्पतरू चौकातून शाळकरी मुले, महिला, वृद्ध तसेच चारचाकी, दुचाकीस्वारांना हा बीआरटीएस रस्ता ओलांडून जावे लागते. या ठिकाणी सिग्नल आहे. मात्र, अनेक वाहनचालक सिग्नलकडे लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात सुदर्शनगर चौक ते जवळकरनगर, कल्पतरू चौकादरम्यान राहुल जाधव हे तीन लहान मुलांसह दुचाकीवरून चौक पार करीत होते. दरम्यान, पिंपळे सौदागरकडून भरधाव वेगात येणाºया मर्सिडिज बेंझ गाडीने त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिल्याने राहुल जाधव यांना जीव गमवावा लागला. तर तसेच तीन लहान मुले या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागील वाहने एकावर एक आदळल्याचीही उदाहरणे आहेत. अनेक वाहनचालक सिग्नल असूनही बेदरकारपणे वाहने दामटताना दिसतात.कल्पतरू चौकात अनेक अपघात घडत असूनही महापालिका प्रशासन गंभीर नसलेले दिसते. या चौकातील सिग्नल अनेकदा बंद अवस्थेतच असतात. तर वाहतूक पोलिसांचा पत्ताच नसतो. आणि ज्यांची नेमणूक केलेली आहे, असे वाहतूक पोलीस बाजूला पावत्या फाडत उभे असल्याचे चित्र असते. त्यामुळे वाहतूक पोलीस असून नसल्यासारखे आहेत.वाढती लोकसंख्या आणि वाढती रहदारी लक्षात घेता जवळकरनगर, कल्पतरु चौकात ग्रेड सेपरेटरची अत्यंत आवश्यकता आहे. शाळकरी मुलांना तर जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागत आहे अन्यथा भविष्यात नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही.वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे पादचाºयांचीही वर्दळ वाढली आहे. त्यामुळे जवळकरनगरमधील कल्पतरू चौकात उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहने भरधाव असल्याने बहुतांश अपघात होत आहेत. त्यामुळे या चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका वैशाली जवळकर यांनी केली आहे.कल्पतरू चौकातील अपघात रोखण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाकडे त्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचीही मागणी सांगवी वाहतूक विभागाकडे करणार आहे. वाहनचालकांनीही आपल्या वाहनांवर वेग नियंत्रण ठेवावे.- सागर अंगोळकर, नगरसेवकचौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे पोलीस कर्मचारी मागणी केली आहे. सकाळी व सायंकाळी चौकामध्ये वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहनचालकांनी आपल्या जिवाची काळजी घेऊन वाहने चालवावीत.- चंदा लोखंडे, नगरसेविकापिंपळे सौदागर व नाशिक फाट्याकडून वाहने वेगात येतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. चौकात पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.- उषा मुंडे, नगरसेविकाजवळकरनगर आणि काशिद वस्तीदरम्यान बीआरटीएस मार्गावर मोठी वर्दळ असते. वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवत वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सिग्नलवर न थांबता भरधाव निघून जातात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.- शशिकांत कदम, नगरसेवक

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड