शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:52 IST

महाराष्टÑ राज्य मंडळ (एसएससी बोर्ड) व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई, आयजी, एनआयओएस, आजीएससीई आदी इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे.

पिंपरी : महाराष्टÑ राज्य मंडळ (एसएससी बोर्ड) व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई, आयजी, एनआयओएस, आजीएससीई आदी इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक झोननिहाय मार्गदर्शन केंद्रामध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची व तपासून घेण्याची (अ‍ॅप्रूव्ह) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील ११ वी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन राबविण्यात येते. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा त्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध केली आहे. त्याव्यतिरिक्त इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शहरात ९ मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. तिथे आॅनलाइन अर्ज भरण्याची व तपासून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.गुजराथी हायस्कूल (फडके हौद), कलमाडी हायस्कूल (एरंडवणे), राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल (सहकारनगर), सिंहगड कॉलेज (सिंहगड रोड), सेंट मीराज कॉलेज फॉर गर्ल्स (कोरेगाव पार्क रोड), आबेदा इनामदार कॉलेज (आझम कॅम्पस, कॅम्प), सेंट पॅट्रिक्स कॉलेज (एम्प्रसे गार्डनजवळ), सिंबायोसिस कॉलेज (सेनापती बापट रोड), भारतीय जैन संघटना कॉलेज (वायसीएम हॉस्पिटल जवळ, पिंपरी), एनएनबीपी हायस्कूल (रहाटणी, पिंपरी), प्रेरणा उच्च माध्यमिक विद्यालय (निगडी प्राधिकरण) आदी मार्गदर्शन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मुख्य ५ विषयांचे (इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र व द्वितीय भाषा) गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. या व्यतिरिक्त विषयांचा विचार केला जाणार नाही.- आयजीएससीई, आयबी, आयजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रकावरील विषयानुसार सर्व विषयाचे गुण एकत्रित घेऊन नंतर ते ५०० गुणांमध्ये रूपांतरीत केले जातील. या विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ फाईव्ह निवडता येणार नाही. तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाव्यतिरिक्त शालेय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण असल्यास असे विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेसाठी अपात्र समजण्यात येतील, असे केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक