शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अंमलदाराचा अपघातात मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: April 16, 2024 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : कर्तव्यावर असताना पोलिस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला. बेंगळुरू - मुंबई महामार्गावर पुनावळे येथे येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : कर्तव्यावर असताना पोलिस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला. बेंगळुरू - मुंबई महामार्गावर पुनावळे येथे येथे सोमवारी (दि. १५) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

सचिन शंकर नरुटे (३७, रा. वाकड, मूळगाव कुपवाड, सांगली) असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार सचिन नरुटे हे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सोमवारी रात्री ते पुनावळे येथून देहूरोड पोलिस ठाण्याकडे जात होते. त्यावेळी पुनावळे पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनामुळे अपघात केल्याने नरुटे जखमी झाले. त्यांना चिंचवड येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सचिन नरूटे हे १६ वर्षांपूर्वी पोलिस दलात भरती झाले होते. ग्रामीण पोलिस ते कार्यरत होते. दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर ते वाकड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यानंतर ते सध्या देहूरोड पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली आहेत.

टॅग्स :Policeपोलिस