शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: January 4, 2025 20:33 IST

संत संवाद कार्यक्रमात आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज बोलत होते

पिंपरी :महाराष्ट्र जागवा, महाराष्ट्र जागा ठेवा, उभा करा. महाराष्ट्र मेला, तर राष्ट्र मेले. महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले. महाराष्ट्र हा देशाचा आधार, असे मत आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराजांनी शुक्रवारी रात्री आळंदीत व्यक्त केले. आळंदी-मोशी रस्त्यावरील वेदश्री तपोवन येथे आयोजित केलेल्या संत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शांतिब्रह्म, वारकरी भूषण मारुती महाराज कुऱ्हेकर, भास्करगिरी महाराज, मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, संत तुकाराम महाराज देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे आदी उपस्थित होते. संप्रदायातील मान्यवरांचा सन्मानयावेळेस संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाची प्रतिकृती मुखमंत्र्यांना देऊन सत्कार करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी डोक्यात शिवरायांचा जिरेटोप डोक्यात न घालता सन्मानपूर्वक नमन करून स्वीकारला.आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवेगोविंदगिरी महाराज म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्या आहेत. आपल्याला मोठी संत परंपरा आहे, वारकऱ्यांच्या छोट्या अपेक्षा आहेत. हरितवारीची क्रांती करायची आहे. आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवे, नदी हा स्वच्छ करायला हवी. आजचा तरुण ड्रक्सच्या अधीन होत आहे. त्याचे प्रमाण पंजाबमध्ये अधिक आहे, पंजाब पोखरला आहे. हे ड्रगचे लोन महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत.गोविंदगिरी महाराज म्हणाले, आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? त्यांना बाहेर कोण काढणार. त्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. तसेच मराठ्यांचा इतिहास, शिवरायांचा खरा इतिहास तरुणांपुढे आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र जागविण्याचे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम व्हावे.फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्पमुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे गंगा नदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा या नद्या स्वच्छ बनवण्यासाठी येत्या काळात पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्प आम्ही करू.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी