पिंपरी : अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिकणार्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हीघटना सोमवारी (दि २७) पहाटे पावणेतीनच्या सुमारास रावेत येथील साई मंगल सोसायटीमध्ये उघडकीस आली.
रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत अरविंद मोहिते (वय १८, रा. साई मंगल सोसायटी, रावेत, मुळ – वाखरी, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अवधूत हा रावेत येथील पीसीसीओ कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे त्याने आपल्या खोलीतील छताच्या फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही घटना त्याच्या रूममेटच्या लक्षात आली.
त्याने तत्काळ शेजार्यांच्या मदतीने अवधूतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीचडॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवधूत हा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावातअसल्याची माहिती त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी दिली.
Web Summary : An 18-year-old student in Ravet tragically ended his life due to academic pressure. Avdhut Mohite, a 12th-grade student, was found hanging in his room. Despite immediate medical attention, he was declared dead. Friends reported he was under significant stress related to his studies.
Web Summary : रावेत में परीक्षा के तनाव के चलते 18 वर्षीय छात्र ने आत्महत्या कर ली। अवधूत मोहिते, 12वीं कक्षा का छात्र, अपने कमरे में लटका हुआ पाया गया। तत्काल चिकित्सा सहायता के बावजूद, उसे मृत घोषित कर दिया गया। दोस्तों ने बताया कि वह पढ़ाई संबंधी तनाव में था।