शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत लेजर लाइट वापरल्यास गुन्हा दाखल करणार; पोलिस आयुक्त चौबे यांची तंबी

By नारायण बडगुजर | Updated: September 12, 2024 22:22 IST

पिंपरी-चिंचवड शहरात पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतात.

पिंपरी : मिरवणुकांमध्ये डीजे तसेच लेजर लाइटचा वापर केला जातो. मात्र, यंदा मिरवणुकीत डीजे आणि लेजर लाइटचा वापर केल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत लेजर लाइटवाले पोलिसांच्या रडारवर आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतात. यात पारंपरिक वाद्य ढोलताशासह डीजेचाही दणदणाट असतो. डीजे वापराला न्यायालयाने बंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अंमलबजाणी केली जात आहे. मात्र, तरीही डीजेचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच लेजर लाइट डोळ्यांसाठी घातक असून, त्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लेजर लाइटच्या वापरास देखील पोलिसांनी मनाइ केली आहे.  

गेल्या वर्षी पुणे येथील विसर्जन मिरवणुकीत लेजर लाइटमुळे अनेकांना डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे लेजर लाइटच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्याच्या वापराला मनाइ करण्याची मागणी होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत लेजर लाइट वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चिंचवड आणि पिंपरी येथे मुख्य विसर्जन मिरणुका असतात. या दोन्ही ठिकाणच्या मिरवणुकांमध्ये शेकडो मंडळे सहभागी होतात. त्यांच्यातील काही मंडळांकडून डीजे तसेच लेजर लाइटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या मिरवणुकांवर पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे. गेल्यावर्षी हिंजवडीत एकाचा मृत्यू -गेल्यावर्षी हिंजवडी येथे विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळे त्रास होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांकडून डीजेवाल्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यापाठोपाठ आता लेजर लाइट वापरणाऱ्यांवर देखील कारवाई करू, असा इशारा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिस