शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:55 IST

‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या अभियानाला १७ दिवस झाले आहेत. या अभियानांतर्गत ५५ ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देजलपर्णीमुक्त पवना ही लोकचळवळ झाली पाहिजे : अमर साबळेरोज ३५ ते ४० मजूर काम करत असताना एनजीओ, निसर्गप्रेमींचा सहभाग

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, जलमैत्री अभियान, भावसार व्हीजन इंडिया, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, मोरेश्वर भोंडवे मित्र परिवार, जेएसपीएम महाविद्यालय-ताथवडे या संस्थांच्या माध्यमातून ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या अभियानाला १७ दिवस झाले आहेत. या अभियानांतर्गत ५५ ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे. भावसार व्हीजनचे राजीव भावसार, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, नदी संवर्धन मोहिमेत गेली १७ वर्षे काम करणारे सोमनाथ मसुडगे, सोमनाथ हरपुडे, युवराज वाल्हेकर,माता जोगेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा माया वाल्हेकर, वासंती कुहार्डे आदींनी पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली. साबळे म्हणाले, ‘‘रोटरी क्लब राबवीत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, यामुळे शहराला भेडसावणाऱ्या समस्या भरपूर प्रमाणात कमी होतील. यासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत गोष्टी पुरविण्यासाठी महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार याकडे पुरवठा करतो, असे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट येथे केले. आज पवना नदीसंवर्धन व नदीपात्राची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून, यासाठी शासकीय स्तरावर वेगळी समिती स्थापन करून जलपर्णीचा समूळ नाश, दूषित पाणी इत्यादी गोष्टींचा विचार केला जाणार आहे. जलपर्णीमुक्त पवना ही फक्त वाल्हेकरवाडी, रावेत किंवा नदीच्या बाजूला राहणाऱ्यांची जबाबदारी न राहता ही मोठी लोकचळवळ झाली पाहिजे. त्याकरिता सर्वांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. जलपर्णी जमा होण्यासाठी वालरोप बांधण्यात आले होते. त्यावर साचलेली जलपर्णी काढण्यात आली. या उपक्रमामध्ये देश का सच्चा हिरो म्हणून ओळख असणारे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवीत केलेले ७० वर्षांचे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, भावसार व्हीजन इंडियाचे राजीव भावसार, महापालिका कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पी.सी.सी.एफ.चे धनंजय शेडबाळे, हेमंत गावंडे, अमोल देशपांडे, गणेश बोरा, वैभव गुघे, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे सचिन काळभोर, जेएसपीएमचे प्रा. भारती महाजन व त्यांचे ५० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, सी.ई.एफ.फोरमचे धनंजय काळभोर व राजकिरण ठाकूर, जाणता राजा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष चेतन शिंदे व सहकारी, डॅशिंग डॅड टीम व कल्याणी इंटरप्रायजेसचे अनिल नेवाळे, वाल्हेकरवाडीतील विविध बचत गटांतील महिला, गजानन चिंचवडे, अशोक भालके, अशोक वाल्हेकर व वाल्हेकरवाडीतील तरुण व लहान मुले-मुली व ग्रामस्थ सहकुटुंब या अभियानामध्ये सहभागी झाले होते.

पालिका नदीसुधार योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सुविधा आपण या उपक्रमाला उपलब्ध करून देऊ, तसेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे आपल्या पाठीशी राहील. शासन पातळीवर लागणारे सर्व सहकार्य मी करेन, असे आश्वासनही साबळे यांनी दिले. तसेच रोटरीच्या उपक्रमाला ११ हजार रुपयांची देणगीही खासदार अमर साबळे यांनी दिली. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठेवलेल्या देणगी कलशामध्ये एकूण ५१ हजार १२० रुपयांची रक्कम जमा झाली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई-उगम ते संगम अशा सुरू केलेल्या अभियानाचा हा तिसरा आठवडा आहे. यामध्ये रोज ३५ ते ४० मजूर काम करत असताना प्रत्येक रविवारी विविध एनजीओ व निसर्गप्रेमी आणि लोकसहभागातून हे अभियान जोराने पुढे जात आहे. रोटरीचे सर्व सदस्य, वाल्हेकरवाडी ग्रामस्थ आणि शहरातील सर्व निसर्गप्रेमी व रानजाई प्रकल्पातील मजूर यांनी आज पाच ट्रक जलपर्णी नदीबाहेर काढून हे अभियान पूर्णत्वास नेले.

टॅग्स :riverनदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड