शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

५० वर्षांपूर्वीची ‘दाय-इची’ कंपनी बंद; गुजरातला स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:50 IST

प्रवेशद्वारावर कामगारांचा ठिय्या

पिंपरी : कासारवाडी-नाशिक फाटा येथील दाय-इची कारकारिया लिमिटेड ही रासायनिक उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेली ५० वर्षांपूर्वीची कंपनी बंद केली आहे. व्यवस्थापनाने २५ जानेवारी २०१९ ला प्रवेशद्वारावर नोटीस लावली आहे. गुजरातमध्ये स्थलांतर करण्यासाठी कंपनी बंद केल्याचे नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. कंपनीत २७ कामगार कायमस्वरूपी नोकरीस होते, तर शंभरजण कंत्राटी आहेत. देय रकमा मिळाव्यात, अशी कायमस्वरूपी आणि निवृत्त कामगारांची आग्रही मागणी आहे.दाय-इची कारकारिया ही कंपनी १९६३ मध्ये कासारवाडी, नाशिक फाटा येथे सुरू झाली. विविध कंपन्यांसाठी रासायनिक माल पुरवठा करणारी ही कंपनी होती. कंपनीत सुरुवातीला ३५० कामगार होते. नंतर कामगार निवृत्त होत गेले. सन १९८७ नंतर कंपनीने भरती केली नाही. कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ २७ कामगार कायमस्वरूपी होते.त्यातही दोन कामगार संघटनांचा मान्यताप्राप्त संघटनेकरिता वाद सुरू आहे. कंपनीतील सुरुवातीची दाय- इची कामगार संघटना आणि नंतर २००८ मध्ये स्थापन केलेली हिंद कामगार संघटना अशा दोन संघटना कार्यरत होत्या. हिंद कामगार संघटनेचे ११, तर दुसऱ्या संघटनेचे १६ सदस्य आहेत. हिंद कामगार संघटनेने मान्यताप्राप्त संघटना म्हणून मान्यता मिळावी, कामगारांचा करार करावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. हिंद कामगार संघटनेचे नेते कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.कामगारांनी कंपनीच्या स्थलांतरास विरोध केला होता. मात्र कंपनी बंदचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. कंपनीने आम्हाला देय रकमा दिल्या आहेत. परंतु मोबदला योग्य प्रकारे मिळाला नाही. कामगारांना योग्य प्रकारे मोबदला द्यावा, या मागणीसाठी कंपनी प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू ठेवले आहे. - संजय काशीद, युनिट अध्यक्ष, हिंद कामगार संघटनाकासारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. घातक रसायनांचा वापर होत असल्याने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार ही कंपनी लाल श्रेणीअंतर्गत वर्गीकृत केली. इथिलिन ऑक्साईड अशा घातक आणि अत्यंत ज्वलनशील रसायनाचा वापर निवासी क्षेत्रात धोकादायक आणि जोखमीचा आहे. त्यामुळे येथील कंपनी गुजरातमधील भरुच या औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरीत केली आहे.- राजेश मुळे,सहायक महाव्यवस्थापक, मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध, दाय-इची कंपनी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGujaratगुजरात