शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 2:46 AM

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी  - गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरातील सोसायट्या व इतर ठिकाणी साप आढळून येतात, असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.वायसीएममध्ये खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव या ग्रामीण भागामधून सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. याबरोबरच शहरामध्ये नदीकिनारी भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वायसीएममध्ये आहे.उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर ते सापांना असह्य होते. तापमान वाढल्यास साप शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या या ठिकाणी थंडावा असल्याने साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. त्याचप्रमाणे चेंबरमध्येही अनेक वेळा साप आढळतात. शहर व आसपासच्या भागामधून दर वर्षी सुमारे १० ते १२ हजार साप पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडले जातात.शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले, तरी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्पमित्रांना आढळून आले आहे. त्यामुळे सर्पदंशापासून सावध राहणे आवश्यक आहे.सर्पदंशानंतर रुग्णाला द्यावी लागणारी लस वायसीएममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमावावा लागू शकतो. सर्पदंश झाला तर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे. - डॉ. शंकर जाधव, उपअधीक्षक,वायसीएम रुग्णालयथंडावा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये येतात. सापांना अतिथंड व अतिउष्ण दोन्हीही वातावरण सहन होत नाही. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करूनच बाहेर पडावे, तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावा. सोसायटीमध्ये अथवा इतर ठिकाणी कोठेही साप आढळल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी दंश करण्याची शक्यता जास्त असते. सर्पमित्रांना कळवावे. जेणेकरून ते सापांना मानवी वस्तीपासून सुरक्षितपणे दूर सोडतील.- राजू कदम, सर्पमित्र

टॅग्स :snakeसापpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड