शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सूचनांनुसार पिंपरीत ३५ रुग्ण दहा दिवसांतच झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 17:13 IST

दहा दिवस उपचार केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला घरी सोडण्यात यावे आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सूचनांनुसार निर्देश

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण १०७ जणांना सोडले घरी पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांची संख्या १७०

पिंपरी : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सूचनेनुसार कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांबाबत हा निर्णय घेतला आहे. दहा दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चोवीस तासांत ३५ रुग्णांना घरी सोडले आहेत. त्यात पुण्यातील चार जणांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना सोडून दिले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेली व्यक्ती रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्या घशातील द्रवांचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यानंतर चौदा दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर २४ तासांत दोन वेळा चाचणी घेतली जात होती. दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात येत होते. 

आदेश येताच रूग्णांना सोडले घरीकोरोना संदर्भात लक्षणे आणि उपचार या संदर्भात दिवसागणिक आदेश जाहीर केले जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी रात्री दिलेल्या नवीन सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला घरी सोडण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिचंवड मधील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आणि पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील ३५ जणांना घरी सोडण्यात आले.  त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण १०७ जणांना घरी सोडले आहे. महापालिका रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांची संख्या १७० झाली आहे.

पुण्यात दिवसाला शंभर रूग्ण वाढीचा आलेख असताना रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ दोनच पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या सक्रिय ५८ जणांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील २० पिंपरीत उपचार घेत आहेत. त्यातील चार जणांचा मृत्यू झालेला असून सात जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर  म्हणाले, ह्यह्यकेंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार रुग्णांबाबत निर्णय घेण्यात आला. ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींवर दहा दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रूग्णांना  घरी सोडले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटल