पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांचे ३३ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढले आहेत. याच काळात नोटाबंदीचा फटका मुद्रांक विक्रीलाही बसल्याने महापालिकेच्या अनुदानात त्यामुळे सुमारे अडीच ते तीन कोटींनी घट झाली आहे. महापालिकेला राज्य सरकारकडून एलबीटी अनुदानाबरोबरच एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराचीही रक्कम दरमहा मिळत असते. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम प्राप्त झालेली नाही. मात्र, आता राज्य सरकारने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या काळातील एक टक्का मुद्रांकशुल्क अधिभारापोटी ३३ कोटी ४० लाख रुपये वितरित केले आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ याच काळात नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. (प्रतिनिधी)
मुद्रांक शुल्कापोटी मिळणार ३३ कोटी
By admin | Updated: March 29, 2017 01:58 IST