शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ३०१ कोटींचा निधी मंजूर - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:51 IST

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी संचालकांची बैठक आज झाली. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या सिस्टीम इंटिग्रेडटरसाठीची सुमारे ३०१ कोेटींची निविदा मंजूर केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी संचालकांची बैठक आज झाली. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या सिस्टीम इंटिग्रेडटरसाठीची सुमारे ३०१ कोेटींची निविदा मंजूर केली आहे. शंकांचे निरसन केले असून, एकमताने निविदेला बैठकीत मंजुरी दिल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची गुरुवारची तहकूब सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. गुरुवारची सभा प्र्रधान सचिव व अध्यक्ष डॉ. नितीन करीर अनुपस्थित असल्याने तहकूब केली होती. आजच्या सभेसही ते अनुपस्थित होते. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे उपस्थित होते. काही कारणांमुळे संचालक आणि केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अनुपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या पहिल्या निविदेत रिंग झाल्याचा आक्षेप राष्टÑवादीने घेतला होता, तर भाजपाच्या सदस्यांनीही त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे संचालक मंडळात काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता होती.स्मार्ट सिटीतील पॅनसिटीत आधुनिक पद्धतीने कामकाज करण्यासाठी जीआयएस मॅपिंग, एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत (एबीडी) पिंपळे सौदागर, गुरव या परिसरातील रस्ते, आधुनिक पद्धतीने पदपथ, अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त स्वच्छतागृह करण्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालासही मान्यता दिली.एल अँड टीला मिळाले कामया कामाला १३ एप्रिलला २५० कोटी आणि अधिक जीएसटी असा खर्च अपेक्षित धरला होता. एल अ‍ॅण्ड टी, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यातील अशोका बिल्डकॉन अपात्र ठरला. उर्वरित दोन निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यांपैकी सर्वांत कमी दराची २५० कोटी आणि जीएसटीसह सुमारे तीनशे कोटींची निविदा स्वीकारली आहे. त्याला सर्वानुमते मान्यता दिली.पहिल्या टप्प्यात अडीचशे कोटींची कामे होणार आहेत. त्यात शहरात साडेसातशे किलोमीटरचे आॅप्टिकल केबल नेटवर्क केले जाणार आहे. त्यासाठी १९७ वायफाय हॉट स्पॉटसाठी १६ कोटी, की-आॅस्कसाठी ९ कोटी, व्हेरिएबल मॅसेज डिस्प्लेसाठी (व्हीएमडी) १६ कोटी, स्मार्ट पोलसाठी ११ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी १४ महिने आणि देखभाल-दुरुस्तीसाठी पाच वर्षे कालावधी निश्चित करण्यात आला. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड