लोणावळा : लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 210 मिमी (8.27 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यामुळे लोणावळा धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्याचा धोका निर्माण झाला असून वलवण धरणातून 100 ते 200 क्युसेक्स या नियंत्रित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाची संततधार सुरु आहे. कालच्या रात्री मात्र परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान वाढला. पहाटे 6 वाजेपर्यत जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी नाले तुंडून भरुन वाहु लागले असून धबधबे देखिल पुर्नजिवित झाले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास लोणावळा धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीलगतच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा धरण प्रमुख बसवराज मुन्नोळ यांनी दिला आहे. तशा आशयांची सुचना पत्रे देखिल मावळ तहसिल व लोणावळा नगरपरिषदेला पाठविण्यात आली आहेत.
लोणावळ्यात २४ तासात २१० मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:27 IST
मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाची संततधार सुरु आहे..
लोणावळ्यात २४ तासात २१० मिमी पाऊस
ठळक मुद्देधरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्याचा धोका