शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:50 IST

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.

लोणावळा -  पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास खंडाळा (बोरघाट) घाटातील अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावरील वळणावर झाला आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.मोहम्मद सल्लाउद्दीन (वय ३१), बाबुभाई नावाज (वय ३१, दोघेही रा. कल्याण, बिदर, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून, गंभीर जखमींमध्ये नबीउद्दीन अधुनी (वय २६, रा. कल्याण, बिदर, कर्नाटक), मोहम्मद आझाद (वय ३४, रा. तमिळनाडू) यांचा समावेश आहे.दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दीन हे तिघेजण त्यांच्या एका वाहनाने काही कामानिमित्त मुंबईला चालले होते. यादरम्यान त्यांचे वाहन खंडाळा बोगदा आणि अमृतांजन पुलाच्या जवळ बंद पडले. त्या वेळी ते नाष्टा करण्यासाठी व चहा पिण्यासाठी दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस चौकीकडे एक्सप्रेस वे मार्गावरून चालले होते. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे सागवान लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या (टीएन-५२/एफ-४७४६) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे चालत असलेल्या मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दीनला ठोकरले. ट्रक लगतच्या डोंगरावर आदळून मार्गावर उलटला. या घटनेत एकाचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत आपत्कालीन पथक आणि महामार्गावरील गस्ती पथकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी सांडलेल्या ट्रकच्या आॅईलमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आॅईलवरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचाºयांनी मार्गावर सांडलेल्या आॅईलवर माती टाकून मार्गावरील मातीची साफसफाई केली. त्यानंतर बाराला वाहतूक सुरू केली.

टॅग्स :Accidentअपघातlonavalaलोणावळा