शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मम्मी मी विष प्यायलो, मला मरायचे आहे"; व्हिडिओ, ऑडिओ करून १८ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल, 'ते' विषारी औषध ऑनलाइन मागवले

By नारायण बडगुजर | Updated: June 22, 2025 22:32 IST

मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळला. 

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : "मम्मी, मला मरायचे आहे, मी विष प्यायलो आहे, मी मोबाईल फोडून टाकतो. पुरावा राहणार नाही, मी लोकेशन पाठवले आहे. माझा मृतदेह घेऊन जा..." अशा आशयाची सुसाईड ऑडिओ आणि व्हिडिओ आईला पाठवून १८ वर्षीय तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळला. 

संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार यांचे आईवडील आणि दोन बहिणी काळेवाडी येथे राहतात. संजयकुमार हा देहूरोड येथील विकासनगर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. मात्र, घरी परत आला नाही. त्यामुळे १७ जून रोजी देहूरोड पोलिस ठाण्यात संजयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. अखेर शनिवारी (२१ जून ) त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला. मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटली आढळली आहे. 

आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बहिणींची चिंता व्यक्त केली असून त्यांना उच्चशिक्षित करा अशी विनंती आई -वडिलांना केली आहे. संजयकुमारने विषारी औषध हे ऑनलाइन मागवले होते. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या ऑडिओमध्ये विषारी औषध प्यायल्याचे त्याने आईला सांगितले. ऑडीओ आणि व्हिडिओ असे दोन क्लिप पोलिसांना मिळून आल्या आहेत. 

संजयकुमार व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला आहे?

"ज्या प्रमाणे इतर लोक मरतात तसा मी ही मरेल... आणखी काही बोलायचे नाही... माझ्या आईवडिलांना एवढेच सांगायचे आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला काही नकोय... केवळ माझ्या बहिणींची चिंता आहे. याव्यतिरिक्त या जगात कुणाची चिंता नाही. दोन्ही बहिणींची चिंता आहे. त्यांना काही झालं नाही पाहिजे. त्यांचे पालनपोषण चांगले व्हायला हवे."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी