शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:55 IST

गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पिंपरी - गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मिरवुणकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दीडशे पोलीस अधिकारी, २२०० पोलीस कर्मचारी, ९० कर्मचाºयांची एक एसआरपी तुकडी, १०० होमगार्ड आणि प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० स्वयंसेवक अशी बंदोबस्ताची यंत्रणा तैनात असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.सांगवी आणि भोसरी परिसरातील गणेशमूर्तींचे सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन झाले. उर्वरित पिंपरी, चिंचवड, निगडी, कासारवाडी या भागातील गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला रविवारी होत आहे. विसर्जन घाटांवर ज्या भागातून विसर्जन मिरवणुका जाणार त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३ पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त तसेच दीडशे पोलीस अधिकारी अशी यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज आहे.उत्सव काळात बेकायदा मद्यसाठा उपलब्ध होणार नाही. याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. हातभट््ट्यांवर कारवाई करून दारूसाठा नष्ट केला आहे. मिरवणुकीत होणारी भांडणे, वाद टाळणे शक्य होणार आहे. मिरवणुकीत ध्वनिक्षेपकावर आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह अशा पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.विसर्जन मार्गावर शक्य तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पिंपरीत तीन ठिकाणी तात्पुरती वाहनतळ सुविधा उपलब्ध केली आहे.नियमांचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हेविसर्जन मिरवुणकीत डीजे वापरणाºया मंडळांनी आवाज मर्यादित ठेवावा. ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची मर्यादा ओलांडणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा गुन्हे दाखल केले जातील. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सांगवी परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवेळी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले़ त्याबद्दल आठ गुन्हे दाखल झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत.शहरात २६ ठिकाणी विसर्जन व्यवस्थापिंपरी : लाडक्या गणरायाला रविवारी निरोप दिला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात २६ ठिकाणी नदी घाटावर महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून गणेशभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहे.शहरातील नदीघाटावर गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर जीवरक्षक तसेच बोट उपलब्ध असेल. तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन नदीपात्रात सोडले जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सूचनाफलकदेखील उभारण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी घाटावर सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर असेल.सर्व विसर्जन घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी बोटीदेखील ठेवण्यात आल्या आहेत.- किरण गावडे,मुख्य अग्निशमक अधिकारी.गणेश तलाव, (प्राधिकरण), जाधव घाट (वाल्हेकरवाडी), रावेत घाट (रावेत, जलशुद्धीकरण केंद्र), किवळेगाव घाट, मळेकर घाट (भोंडवे वस्ती, रावेत), थेरगाव पूल नदीघाट, मोरया गोसावी नदी घाट (चिंचवड), केशवनगर, चिंचवड घाट, ताथवडे स्मशान घाट, राममंदिर घाट (पुनावळेगाव), वाकड गावठाण घाट, कस्पटेवस्ती घाट, सांगवी स्मशान घाट, सांगवी दशक्रिया विधी घाट, कासारवाडी स्मशान घाट, फुगेवाडी स्मशान घाट, बोपखेल घाट, पिंपरीगाव, स्मशान घाट, काळेवाडी स्मशान घाट, पिंपळेगुरव घाट, काटे पिंपळे घाट क्र. १, सुभाषनगर घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट याठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या