शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरातील १४ पोलीस कोरोना ‘पाॅझिटिव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 21:53 IST

कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आला. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी कोरोनाला शहर दलात एन्ट्री करण्यापासून रोखले. मात्र १५ मे २०२० रोजी शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची  लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनाही मोठ्या संख्येने कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यामुळे पोलिसांसाठी आयुक्तालयस्तरावर कोरोना सेल उभारण्यात आला. या सेलच्या माध्यमातून उपचाराच्या सुविधा, औषधोपचार उपबल्ध करून देत पोलिसांचे मनोबल उंचावण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी कोरोनावर मात केली. 

शहरातील ९४६ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील ९४२ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील एकाही पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. मात्र आठवड्याभरापासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्यावर गेली. यात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली. 

हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच अधिकाऱ्यांना संसर्ग कारोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हिंजवडी पोलीस ठाण्याला बसला आहे. या पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी कोरोना पाॅझिटिव आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या बाधित असलेल्यांमध्ये महिला अधिकारीही आहेत. इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात आले आहे. 

शहर पोलीस दलातील मनुष्यबळ -एकूण अधिकारी - ३४५एकूण कर्मचारी - २९३०

आतापर्यंत कोरोनावर मात केलेले पोलीस -अधिकारी - १३०कर्मचारी - ७९८

सध्या कोरोना पाॅझिटव असलेले पोलीस -अधिकारी - ७कर्मचारी - ७

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्या