शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण; तीन वर्षांनंतर आढळले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 19:40 IST

दोन वर्षांत गेला होता ९५ जणांचा बळी....

- प्रकाश गायकर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये शहरामध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह वैद्यकीय विभागाचीही चिंता वाढली आहे.

शहरामध्ये २०१९ साली १९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी स्वाइन फ्लूची लस आणि टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येत होते. त्यामुळे स्वाइन फ्लू आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा त्याने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. शहरामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून थंडी-तापांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये ५०३ डेंग्यूचे संशयित आढळले आहेत. तर ३७ जणांना डेंग्यू झाला आहे.

चिकनगुनियाचे पाच संशयित तर ९२७१ जणांना मलेरिया सदृ्श आजार होता. साथीचे हे आजार वाढलेले असताना आता त्यामध्ये स्वाइन फ्लूची देखील भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर १८ जण संशयित आहे.

शुक्रवारी (दि. ५) एका दिवसामध्ये ३३१९ रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी तीव्र थंडी-तापाचे ४१२ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती झाले आहे. त्यापैकी ६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गेल्या आठ दिवसांमध्ये दोन संशयित रुग्णांचा बळी गेला आहे. त्यांचा मृ्त्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे का? याबाबत प्रशासन पडताळणी करत आहे. दोन वर्षांत गेला होता ९५ जणांचा बळीपिंपरी चिंचवड शहरामध्ये २०१७  व २०१८ या दोन वर्षांमध्ये स्वाइन फ्लूने कहर केला होता. २०१७ मध्ये तब्बल ४१३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर ६१ जणांचा मृत्यू झाला. तसेच २०१८ मध्ये २४३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwine Flueस्वाईन फ्लू