शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगग्रस्तांसाठी केले केस दान, चिंचवडमधील १३ वर्षीय आदिती जैनचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 02:15 IST

काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे.

चिंचवड - काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. कर्करोगग्रस्तांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला तिने स्वत:चे केस कापून दान केले आहेत. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.चिंचवडमधील हे जैन कुटुंबीय जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असतात. मृत्यू पश्चात अवयवदानाची मोहीम सध्या जैन सोशल ग्रुपकडून केली जात आहे. याच कार्यातून दानाची महती मिळालेल्या आदितीने कर्करोगग्रस्त महिलांसाठी केस दान करण्याचा मनोदय आपल्या आईवडिलांना बोलून दाखविला. पाचवीत शिक्षण घेणारी आदिती आई-वडिलांसोबत एका कर्करोगग्रस्त महिला नातेवाइकांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा उपचार घेणाºया महिलेला केस नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पालकांना विचारले असता अशा रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तिच्या लक्षात आले. अशा महिलांना कोणी केसदान केले, तर मुंबईमधील संस्था या केसांचे टोप बनवून कर्करोग महिलांना देत असल्याचे तिला समजले. तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता स्वत:चे केस या संस्थेला दान करण्याची इच्छा पालकांकडे व्यक्त केली.आदितीची आई अपर्णा जैन यांनी याबाबत आदितीच्या वडिलांना सांगितले. तिचे वडील जितेंद्र जैन यांनी मुलीच्या या निर्णयाचे स्वागत करून मुंबईतील ‘मदत चॅरिटीबल ट्रस्ट’ या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा सांगितली.लहानपणीच समाजसेवेची शिकवणकर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारादरम्यान त्यांना केस गमविण्याची वेळ येते. त्यांना पुन्हा केस येत नाहीत, अशा घटनेत त्यांना केसांचा टोप बसवावा लागतो. यासाठी काम करणाºया संस्थेला समाजातून सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत. मुलांमध्ये लहान वयातच सामाजिक कार्य करण्याचे विचार रुजावेत ही खरी काळाची गरज आहे. जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान, अवयवदान, श्रमदान व शैक्षणिक दानाचे कार्य केले जाते. या कार्याची शिकवण मुलांमध्ये रुजत असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत.मुंबईतील ‘मदत चॅरिटीबल ट्रस्ट’ या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा सांगितली. आदितीने लगेच आपले केस कापून संस्थेकडे पाठविले. आदितीने केलेल्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnewsबातम्या