शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय चांगला; पण मुलांचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 06:49 IST

शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी एक मिनिट जरी उशीर झाला तरी परीक्षेस बसता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे.

पिंपरी : शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी एक मिनिट जरी उशीर झाला तरी परीक्षेस बसता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय योग्य असल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले; पण विद्यार्थ्यांच्या तत्कालीन परिस्थितीचाही विचार होणे गरजेचे आहे, असे सांगितले. पालकांनी मात्र या निर्णयाला विरोध केला. वाहतूककोंडीसारख्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला, तर विनाकारण विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पालकांनी केली आहे.सध्याच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे गांभीर्य पहावयास मिळत नाही . या नियमामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करतील. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी या नियमाचा उपयोग होईल.येत्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावे लागणार असल्याने तो उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करेल. या निर्णयामुळे कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होईल. झटपट परीक्षा देऊन पळ काढणाºया आणि परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी, तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे.- अतुल ओतारी, मुख्याध्यापक, श्रीपती बाबामहाराज माध्यमिक विद्यालयशालेय शिक्षण विभागाने नुकत्याच दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात जाहीर केलेल्या नव्या नियमांचे स्वागत करते. या नियमामुळे सातत्याने घडणाºया पेपरफुटीला आळा बसेल. काही विद्यार्थी त्यांना मिळालेल्या अतिरिक्त वेळेत गैरप्रकार करतात. या नियमांमुळे त्याला आळा बसेल विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत असणारी मानसिकता बदलण्यासाठी या नियमावलीचा निश्चित उपयोग होईल.केवळ काही वेळ परीक्षा दालनात बसून लगेच पळ काढणाºया विद्यार्थ्यांना चाप बसणार असून, परीक्षेसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत परीक्षा दालनाबाहेर न गेल्याने विद्यार्थी काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करेल.- चैताली फाटक, प्राचार्या, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, गंगानगर, आकुर्डीमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षेबाबत घेतलेला निर्णय अयोग्य आहे. मुलांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, शाळेमध्ये परीक्षा नंबर शोधणे, वाहतूक कोंडीचा अडथळा यामुळे परीक्षार्थींना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.- तानाजी मोरे, प्राचार्य, नृसिंह हायस्कूल, जुनी सांगवीनिर्णयामध्ये थोडीशी लवचिकता असावी. बºयाच वेळा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅफिक जाम,अपघात अशा घटनांमुळे उशीर होऊ शकतो.- राजेंद्र पवार, मुख्याध्यापक, अभिनव माध्यमिकविद्यालय, जाधववाडीतळवडे येथे नियमितपणे होणारी वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्याला अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर होऊ शकतो, अपवादात्मक परिस्थितीत उशिर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळायला हवा.- गोवर्धन चौधरी, मुख्याध्यापक राजाशिवछत्रपती विद्यालय, तळवडेबोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत केले आहे. केंद्र संचालक व शाळेच्या दृष्टीने हा अतिशय चांगला निर्णय आहे. गैरप्रकाराला आळा बसेल. अर्धा तास परीक्षा केद्रांवर हजर राहणे हे बंधनकारकच असते.- अन्सार शेख, प्राचार्य, म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीशासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेसंबंधी जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु त्यात थोडी सुधारणा आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी उशिरा आलाच, तर त्याला कारण स्पष्ट करण्याची संधी देण्यात यावी, तसे त्या विद्यार्थ्याकडून लेखी हमी घ्यावी. दुसºया दिवशीही उशिरा आला तर कारवाई करावी. या निर्णयाचा त्रास शहरी व ग्रामीण मुलांना होऊ शकतो. वेळेवर बस न मिळणे, वाहन बिघाड अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांबाबत प्रसंगानुसार निर्णय घेण्यात यावा. नाहीतर प्रामाणिक विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ शकते.- ए. एस. कराडे, शिक्षक, पीसीएमसी स्कूल, बोपखेलशासनाने घेतलेला निर्णय योग्य असून, मात्र यात काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे बाजूने त्या त्या वेळी त्या विद्यार्थ्यांचे त्या वेळचे कारण व परिस्थिती लक्षात घेता निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याचे काही अतिशय अतिमहत्त्वाचे व ते सत्य परिस्थिती असेल तर त्याची माहिती केंद्रप्रमुख याने घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. तसेच पालकांनी आपल्या पाल्यास वेळेत परीक्षा ठिकाणी पाठवणे कर्तव्य असून, शासनाने विद्यर्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्णय असावा, पण तो जाचक नको.- शिवाजीराव माने,सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालय, सांगवी, पुणेशासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, यात अनेक त्रुटी आहेत, विद्यार्थी बस अथवा इतर वाहनाने परीक्षा देण्यासाठी येत असताना काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन उशिरा होतो. अथवा अति महत्त्वाचे कारण घडल्यास परंतु परीक्षा देणे गरजेचे असताना उशिरा आल्यास त्यावेळी निर्णय घेताना त्या विद्यार्थ्यांचे हित बघून निर्णय घेण्यात यावा. मात्र परीक्षा केंद्रात वेळेआधी पोहचणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सिग्नल, गर्दी, रस्ते आदी गोष्टी परीक्षा ठिकाणी पोहचण्यास जबाबदार असतात, त्यावर शासनाने विचार करावा. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा निर्णय घेऊ नये.रमाकांत आरेकर,पालक, नवी सांगवीअचानकपणे अनपेक्षित गोष्टी घडल्या, तर विद्यार्थ्याला परीक्षेला येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे किमान दहा मिनिटे तरी विद्यार्थ्याला द्यायला हवीत. जर त्याला परीक्षेस बसू दिले नाही, तर विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ शकते.- कुमार सोनटक्के, मुख्याध्यापक,लक्ष्मीबाई धाइंजे माध्यमिक विद्यालयदहावी-बारावीमध्ये असलेले विद्यार्थी पालकांवर अवलंबून असतात. अनेक विद्यार्थी स्वत: परीक्षा ठिकाणी येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा ठिकाणी जाऊन शासनाचा निर्णय अमलात आणावा.- प्रभाकर हिंगे, पालक, दापोडी

टॅग्स :Maharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळStudentविद्यार्थी