शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पाच बायका फजिती ऐका; WWE सुपर स्टारची दैना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:49 IST

1 / 7
WWEमधील माजी सुपरस्टार रिक फ्लेअरनं वयाच्या 69 व्या वर्षीही पाचवं लग्न केलं. मागील वर्षी त्यानं आपल्यापेक्षा दहा वर्षानं लहान असलेल्या महिलेशी लग्न केलं.
2 / 7
यापूर्वीची चार लग्न तुटल्यानंतर फ्लेअर खूप दुःखात होता आणि त्याचा लग्नावरील विश्वासही उडाला होता. पण, पुन्हा एकदा त्यानं आपलं मन बदललं आणि पाचव्यांदा बोहोल्यावर चढला.
3 / 7
WWE चं जेतेपद 16 वेळा पटकावणाऱ्या फ्लेअरच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार आले. त्यानं 1971मध्ये लेस्लीसोबत पहिलं लग्न केलं. लेस्ली आणि फ्लेअर यांचं नातं 12 वर्ष टिकलं.त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना मीगन व डेव्हीड अशी दोन मुलंही आहेत आणि ती लेस्लीसोबत राहतात..
4 / 7
1983ला पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यानं एलिजाबेथ हॅरेलसोबत विवाह केला. त्यांचं हे नात 23 वर्ष टिकलं. या दोघांनाही रीड आणि एश्ली अशी दोन मुलं आहेत आणि 2006मध्ये त्यानी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या वेळी फ्लेअरनं पत्नी एलिजाबेथवर मारझोड केल्याचा आरोप केला.
5 / 7
2006मध्ये फ्लेअरनं टिफनी वेनडिमार्कशी विवाह केला आणि त्याचं हे तिसरं लग्न होतं. हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि टिफनीशी घटस्फोट घेतानाही फ्लेअरनं तिच्यावर मारझोड करण्याचा आरोप केला होता. तिनं फोनच्या चार्जरनं फ्लिकरवर हल्ला केला होता. 2009मध्ये त्यांच्या घटस्फोटाचा अर्ज न्यायालयानं मान्य केला.
6 / 7
2009मध्येच फ्लेअरनं जॅकी बीमसोबत विवाह केला. यांचं नातही फार टिकलं नाही. फ्लेअरनं बीमवरही मारझोड केल्याचा आरोप केला होता. फ्लेअरनं त्याची पोलिसांतही तक्रार केली होती.
7 / 7
त्यानंतर फ्लेअरनं गतवर्षी 58 वर्षीय वेंडी बार्लोशी विवाह केला. फ्लेअरनं याआधीच्या चारपैकी तीन पत्नींवर मारल्याचा आरोप केला.
टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई