शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ताजमहाल मोफत पाहण्याची संधी, कोणतेही तिकीट आकारले जाणार नाही, जाणून घ्या सविस्तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 4:06 PM

1 / 7
ताजमहाल पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ताजमहालला भेट देण्यासाठी जाणाऱ्यांना विना तिकीट प्रवेश मिळणार आहे. जागतिक वारसा सप्ताहांतर्गत (world heritage week) 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आग्रा येथील ताजमहालमध्ये प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
2 / 7
ताजमहाल पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ताजमहालला भेट देण्यासाठी जाणाऱ्यांना विना तिकीट प्रवेश मिळणार आहे. जागतिक वारसा सप्ताहांतर्गत (world heritage week) 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आग्रा येथील ताजमहालमध्ये प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
3 / 7
जागतिक वारसा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी सर्व स्मारकांना मोफत प्रवेश दिला जातो. पुरातत्व विभागाने फतेहपूर सिक्री मेमोरियल येथे चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्याची सुरुवात केली आहे.
4 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्व विभागाकडून आग्रा येथील फतेहपूर सिक्री मेमोरियल येथून जागतिक वारसा सप्ताहाची सुरुवात होणार आहे. यावेळी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार असून यामध्ये विविध शाळांमधील मुले सहभागी होणार आहेत.
5 / 7
दरम्यान, 19 नोव्हेंबरला ताज पाहायचा असेल तर तो टाळणेच योग्य ठरेल. हा दिवस रविवार असून प्रवेशही विनामूल्य असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जागतिक वारसा सप्ताहाची सुरुवातही याच दिवशी होत आहे. या काळात ताजमहालवरील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.
6 / 7
अशा परिस्थितीत, ज्या लोकांना ताजला शांततेने भेट द्यायची आहे, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहामुळे ताजमहालसह अन्य मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
7 / 7
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताजगंज पोलिस ठाण्याच्या पोलिसांव्यतिरिक्त इतर ठिकाणांहूनही फौजफाटा मागवण्यात आला असून, येथे कोणकोण तैनात केले जातील. यापूर्वी पर्यटकांसोबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.
टॅग्स :Taj MahalताजमहालUttar Pradeshउत्तर प्रदेश