By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:13 IST
1 / 7रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून फिरण्याचे बेत आखले जातात. निसर्गाच्या सान्निध्यात शांत ठिकाणी मनसोक्त एन्जॉय करणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र तुम्हाला माहितीय का? असं बेट आहे जिथे केवळ महिलांनाच प्रवेश आहे. पुरुषांना बंदी असलेल्या या बेटाविषयी विषयी जाणून घेऊया.2 / 7'सुपरशी' असं या बेटाचं नाव असून ते फिनलँडमध्ये वसले आहे. 'सुपरशी' बेट ही एक अशी सुंदर जागा आहे जिथे फक्त आणि फक्त महिलाच जाऊ शकतात.3 / 7अमेरिकेच्या क्रिस्टिना रूथ यांनी केवळ महिलांसाठीच हे खास बेट तयार केले आहे.4 / 7महिलांची सुरक्षितता, स्वास्थ्य आणि स्वातंत्र्य लक्षात घेऊन हे खास ठिकाण तयार करण्यात आले आहे. 5 / 7 'सुपरशी' बेटावर सिगारेट, दारू सारख्या काही हानिकारक पदार्थाना बंदी आहे. 6 / 7बेटावर लाकडाची सुंदर टुमदार घरं तयार करण्यात आलेली असून तिथे महिलांच्या राहण्याची सोय केली जाते. तसेच खाण्यासाठी ताज्या पालेभाज्या आणि फळांची व्यवस्था आहे.7 / 7बेटावर महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत मनसोक्त फिरण्याचा आनंद घेता येतो.