By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 20:40 IST
1 / 6मार्च महिना संपला की सूर्यनारायण आपला प्रकोप दाखवायला सुरुवात करतो. गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, काही शहरांत तापमान ५० ते ५५ अंशांच्या पार जाऊ लागले आहे. यंदाही हवामान विभागाने भीषण उन्हाळ्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत अंगाची लाहीलाही होत असताना प्रत्येकाला वेध लागतात ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचे.2 / 6जेव्हा हिल स्टेशनचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे शिमला, मनाली किंवा नैनिताल. पण आता ही ठिकाणं इतकी कॉमन झाली आहेत की तिथे पर्यटकांची तुफान गर्दी असते. तुम्हाला जर या उन्हाळ्यात गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी ४ भन्नाट पर्याय घेऊन आलो आहोत.3 / 6काश्मीर : काश्मीरला उगीच 'धरतीवरील स्वर्ग' म्हटले जात नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला भेट देणे हा एक राजेशाही अनुभव असतो. श्रीनगरमधील दल लेक, गुलमर्गची बर्फातील मजा आणि सोनमर्गचे सौंदर्य तुमचे मन जिंकून घेईल. इथल्या दऱ्यांमध्ये फिरल्यानंतर तुमची वर्षभराची मरगळ झटकन दूर होईल.4 / 6लेह-लद्दाख : जर तुम्हाला तुमच्या ट्रिपमध्ये थोडा थरार आणि साहस हवे असेल, तर लेह-लद्दाखचा प्लॅन करा. जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी हे एक आहे. इथली निळीशार सरोवरे, शांत तिबेटी मठ आणि बर्फाच्छादित डोंगररांगा तुमची सहल अविस्मरणीय बनवतील. इथल्या वातावरणात तुम्ही स्वतःला ढगांच्या वर असल्याचा अनुभव घेऊ शकता.5 / 6उटी : उन्हाळ्याच्या सुट्टीत दक्षिणेकडे जायचा विचार असेल, तर 'उटी'ला पर्याय नाही. कॉफी आणि चहाच्या मळ्यांनी वेढलेले हे शहर निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. इथले उंच डोंगर आणि थंड वारे तुम्हाला उन्हाळ्याचा विसर पाडतील. नवविवाहित जोडप्यांसाठी हे सर्वात रोमँटिक ठिकाण मानले जाते.6 / 6दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे जगातील सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी एक मानले जाते. एप्रिल-मे महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. चहाच्या हिरव्यागार मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालते. इथे टायगर हिल, रॉक गार्डन, हॅप्पी व्हॅली टी इस्टेट आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची (टॉय ट्रेन) सफर नक्की करा.