शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:08 IST

1 / 8
भारत हा वैविध्यपूर्ण भूभागाचा देश आहे, जिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मनमोहक नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. मनाली, शिमला किंवा दार्जिलिंगची गर्दी आता अनेकांना नकोशी झाली आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत शांतता अनुभवायची असेल, तर भारतातील अशी अनेक 'अनटच्ड' आणि सुंदर हिल स्टेशन्स आहेत, जिथे लोक अजूनही फारसे पोहोचलेले नाहीत.
2 / 8
चकराता, उत्तराखंड : उत्तराखंडमधील चकराता हे एक अत्यंत शांत आणि सुंदर हिल स्टेशन आहे. येथील घनदाट जंगलं, धबधबे आणि प्राचीन गुंफा येथील सौंदर्यात भर घालतात. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रात्री चांदण्या पाहण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. शांत वातावरणामुळे हे 'सोलो ट्रॅव्हलर्स' आणि फॅमिली ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय आहे.
3 / 8
कोकरनाग, जम्मू-काश्मीर : कोकरनाग हे इथल्या ताज्या नैसर्गिक झऱ्यांसाठी आणि बोटॅनिकल गार्डन्ससाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्यात येथील हवामान खूप आल्हाददायक असते. येथे तुम्ही मुघल गार्डन पाहू शकता, ट्राउट फार्मला भेट देऊ शकता आणि हिरव्यागार जंगलांमध्ये वॉकचा आनंद घेऊ शकता.
4 / 8
तिर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश : 'हिमाचलचे बेस्ट कीप्ट सिक्रेट' म्हणून ओळखली जाणारी तिर्थन व्हॅली हिरवळ, बर्फाच्छादित शिखरे आणि स्वच्छ नदीसाठी ओळखली जाते. इथे ट्रेकिंग, फिशिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेता येतो. गर्दीपासून दूर निसर्गात शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण उत्तम आहे.
5 / 8
अराकू व्हॅली, आंध्र प्रदेश : कॉफीच्या मळ्यांसाठी आणि आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेली अराकू व्हॅली मे महिन्यात आपल्या पूर्ण रंगात असते. येथील थंड हवेमुळे आणि फुललेल्या फुलांमुळे मन प्रसन्न होते. येथे तुम्ही आदिवासी म्युझियम पाहू शकता, गुंफांना भेट देऊ शकता आणि धबधब्यांच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता.
6 / 8
कल्पेट्टा, केरळ : वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा हे शांतता आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथून चेम्ब्रा पीक आणि हिरवीगार जंगले यांचा जबरदस्त देखावा दिसतो. जर तुम्हाला गर्दी टाळून ताजी हवा आणि शांत वातावरणात वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण एकदम योग्य आहे.
7 / 8
कुर्सियांग, पश्चिम बंगाल : 'लँड ऑफ व्हाईट ऑर्किड्स' म्हणून प्रसिद्ध असलेले कुरसियांग हे दार्जिलिंगजवळ वसलेले आहे. इथे पर्यटकांची गर्दी कमी असली तरी, उत्कृष्ट चहाचे मळे आणि हिमालयाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथे हेरिटेज वॉकचा आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेता येतो.
8 / 8
वट्टाकनाल, तामिळनाडू : कोडाईकनालपासून जवळ असलेले वट्टाकनाल हे पर्वतांमध्ये लपलेले एक छोटे पण अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील दऱ्या, नागमोडी पायवाटा आणि ढगांनी वेढलेले डोंगर तुमच्या मनाला शांती देतात. इथले छोटे कॅफे आणि शांत वातावरण या ठिकाणाला गर्दीपासून पूर्णपणे वेगळा अनुभव देतात.
टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारत