Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:38 IST
1 / 7थायलंड! भारतीय पर्यटकांसाठी हे केवळ एक 'डेस्टिनेशन' नाही, तर 'बजेट-फ्रेंडली' परदेशी सुट्टीचे समीकरणच बनले आहे. कुटुंबासोबत निवांत क्षण घालवायचे असोत, किंवा सोलो-ट्रीपवर निसर्गाचा अनुभव घ्यायचा... प्रत्येक भारतीयाच्या 'विदेशी टूर'च्या यादीत थायलंडचे नाव सर्वात वर असते. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२५मध्ये जवळपास २० लाख भारतीयांनी थायलंडला भेट दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक का जात आहेत? कारण स्पष्ट आहे: येथील स्वस्त आणि मस्त जेवण, परवडणारे हॉटेल्स, आणि कमी बजेटमध्ये 'रॉयल' वाटणारी ट्रिप!2 / 7सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की, 'किती पैसे घेऊन जावे?' जर तुम्ही भारत सोडून थेट थायलंडला जाण्याची तयारी करत असाल, तर ₹१,००,००० रुपये ही रक्कम तुमच्या एका आठवड्याच्या प्रवासासाठी अगदी राजेशाही ठरू शकते. तुम्ही १०० रुपये दिले, तर तुम्हाला साधारण ३५ ते ४० थाई बाथ मिळतील. याचाच अर्थ, तुमच्याकडील १ लाख रुपयांचे रूपांतर अंदाजे ३५,००० ते ४०,००० थाई बाथमध्ये होईल. इतके पैसे तुम्ही हॉटेल, खाणे, फिरणे आणि शॉपिंगवर सहज खर्च करू शकता.3 / 7प्रवासाचा सर्वात मोठा खर्च तिकीटावर होतो. तुम्ही बुकिंग कधी आणि किती लवकर करता यावर ते अवलंबून असते. अंदाजित ₹१५,००० ते ₹३५,००० परतीच्या प्रवासाचे विमान तिकीट काढता येते. थायलंडमध्ये राहण्यासाठी अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. बजेट हॉटेल ४००–८०० थाई बाथ (₹१,०००–₹२,००० रुपये) एका रात्रीसाठी आकारते. तर, मिड-रेंज हॉटेल १ रात्रीसाठी १,२००–२,००० थाई बाथ (₹३,०००–₹५,००० रुपये) आकारते. 4 / 7थायलंड 'स्ट्रीट फूड'साठी जगप्रसिद्ध आहे. इथे पोटपूजा अगदी स्वस्तात होते. स्ट्रीट फूड ५०–१२० थाई बाथ (₹१२०–₹३०० रुपये), तर चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण १५०–२५० थाई बाथ (₹४००–₹६०० रुपये) मिळते. बँकॉक किंवा पटायामध्ये फिरण्यासाठी मेट्रो आणि बस हा स्वस्त पर्याय आहे, पण 'तुक-तुक'मध्ये बसण्याचा अनुभव वेगळाच असतो. मेट्रो/बससाठी २०–५० थाई बाथ (₹५०–₹१२०), तर, तुक-तुकसाठी ८०–१५० थाई बाथ (₹२००–₹३५०) लागतात.5 / 7थायलंडमध्ये तुम्ही केवळ समुद्रकिनारे पाहत बसत नाही, तर अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकता. आरामदायक थाई मसाज २५०–४०० थाई बाथ (₹६००–₹१,०००), आयलंड हॉपिंगसाठी ८००–१,५०० थाई बाथ (₹२,०००–₹३,५००), नाइट क्रूझ/थीम शोसाठी १,०००–२,००० थाई बाथ (₹२,५००–₹५,०००) लागतात.6 / 7शॉपिंग लव्हर्ससाठी थायलंड 'जन्नत' आहे. येथे खूप चांगल्या आणि युनिक वस्तू स्वस्त दरात मिळतात. हातमागाचे कपडे, बॅग्ज आणि घराच्या सजावटीच्या वस्तू खूप स्वस्त मिळतील. टी-शर्ट फक्त १००-३०० थाई बात (₹२५०-₹७००) मध्ये मिळू शकतो. रंगीबेरंगी चीनी मातीच्या भांड्यांचा संग्रह. ही एक खास 'कलेक्शन आयटम' आहे. नारळाचे तेल, साबण आणि चॉकलेट्स पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहेत.7 / 7थाई ताबीज हे केवळ सजावटीचे नसून, थायलंडच्या बौद्ध परंपरेचा एक भाग मानले जाते. थायलंड ट्रिप प्लान करताना, तुम्ही तुमचा खर्च आणि धमाल यांचा योग्य समन्वय साधू शकता. फ्लाइट आणि राहण्याच्या खर्चाव्यतिरिक्त जर तुम्ही ₹४०,००० ते ₹५०,००० सोबत घेऊन गेलात, तर तुमची ट्रिप खूपच आरामदायक आणि संस्मरणीय ठरेल, यात शंका नाही!