Tourist places of India: कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग या ५ शहरांना बनवा ट्रॅव्हल डेस्टिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:50 IST
1 / 6भारतामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कुटुंबासह एन्जॉय करू शकता. आज आम्ही तुम्हाला पाच अशी ठिकाणे दाखवणार आहोत जिथे तुम्हाला कुटुंबासह फिरणे खूप आवडू शकते. 2 / 6आग्रा हे भारतातील एक चर्चित टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथे ताजमहालाशिवाय आग्रा फोर्ट सारख्या ऐतिहासिक इमारती आहेत. तिथे फिरणे लहान मुलांनाही आवडू शकते. 3 / 6जर तुम्ही नँचरल सौंदर्यामध्ये कुटुंब आणि मुलांसह एंजॉय करू इच्छित असाल तर तुम्हाला सुंदर दऱ्याखोऱ्यांनी वसलेले दार्जिलिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. प्राकृतिक रूपाने स्वर्ग मानले जाणाऱ्या दार्जिलिंगमध्ये तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. 4 / 6सरोवरांचे शहर असलेल्या श्रीनगरमध्ये फिरण्यासाठी जाणार असाल तर किमान सात दिवसांचा वेळ काढून इथे जा. कारण इथे अनेक अशा गोष्टी आहेत. ज्या तुमच्याबरोबरच तुमच्या मुलांनाही खूप आवडू शकतात. 5 / 6तलावांचे नगर मानल्या जाणाऱ्या नैनीतालमध्येही निसर्ग सौंदर्याची उधळण करणारी अनेक ठिकाणे आहेत. येथील पर्वतांमध्ये कुटुंबासोबत सेल्फी घेण्याची मजा काही औरच आहे. तसेच येथे मुलांसाठीही खूप काही अॅक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. 6 / 6अंदमान आणि निकोबारला फॅमिली ट्रीपसाठी बेस्ट लोकेशन मानले जाते. समुद्रामध्ये वसलेल्या या बेटांवर एंजॉय करणे हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आहे.