By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 18:34 IST
1 / 8भारत हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. येथील समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि हिमालयाची शिखरे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात येतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? भारतातील अशी काही ठिकाणे आहेत जिथे केवळ पासपोर्ट आणि व्हिसा असून चालत नाही. 2 / 8सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा आंतरराष्ट्रीय सीमांच्या जवळ असल्याने, या ठिकाणी जाण्यासाठी परदेशी नागरिकांना सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागते. इतकेच नाही, तर काही ठिकाणी भारतीय नागरिकांनाही 'परमिट'शिवाय प्रवेश मिळत नाही.3 / 8सिक्कीम: सिक्कीमच्या सुंदर दऱ्या आणि स्वच्छ तलाव पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांना सरकारी ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून 'प्रोटेक्टेड एरिया परमिट'साठी अर्ज करावा लागतो.4 / 8मिझोराम आणि नागालँड: मिझोराम आणि नागालँड या राज्यांमध्ये स्थानिक संस्कृती आणि जनसांख्यिकीय समतोल राखण्यासाठी कडक नियम आहेत. परदेशी पर्यटकांना येथे आल्यावर २४ तासांच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा 'विदेशी नोंदणी कार्यालयात' नोंदणी करावी लागते. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.5 / 8लडाखचे: बर्फाच्छादित डोंगर आणि निळ्याशार तलावांसाठी प्रसिद्ध असलेले लडाख प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते. मात्र, सीमावर्ती भाग असल्याने येथे परदेशी पर्यटकांना 'प्रोटेक्टेड एरिया परमिट' घ्यावेच लागते. भारतीयांनाही काही विशिष्ट भागांत जाण्यासाठी विशेष परवानगीची गरज असते.6 / 8अरुणाचल प्रदेश: ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यासाठी परदेशी नागरिकांना 'प्रोटेक्टेड एरिया परमिट' घ्यावा लागतो. हे परमिट मिळवण्यासाठी सरकारमान्य टूर ऑपरेटर्सची मदत घ्यावी लागते. विशेष म्हणजे, भारतीयांनाही येथे प्रवेशासाठी 'इनर लाईन परमिट' घेणे बंधनकारक आहे.7 / 8उत्तराखंडचे चकराता: देहरादून जिल्ह्यातील चकराता हे थंड हवेचे ठिकाण देवदारच्या घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लष्करी छावणी क्षेत्र असल्याने येथे परदेशी पर्यटकांना थेट प्रवेश मिळत नाही. त्यांना विशेष परवानगी घ्यावी लागते आणि तिथे राहण्याची मुभा मिळणे तर अतिशय कठीण असते. भारतीयांना मात्र आधार कार्ड दाखवून येथे सहज फिरता येते.8 / 8या ठिकाणांपैकी बहुतांश भाग आंतरराष्ट्रीय सीमांना लागून आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि संवेदनशील आदिवासी जमातींच्या संरक्षणासाठी भारत सरकारने हे निर्बंध घातले आहेत. याशिवाय अंदमान-निकोबारमधील काही बेटे, लक्षद्वीप आणि सियाचीन ग्लेशियर यांसारख्या ठिकाणीही प्रवेशासाठी अशाच प्रकारच्या विशेष परवानग्यांची गरज असते.