'हा' आहे नरकाचा दरवाजा, येथे गेलेला माणूस कधीही परत येत नाही कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:55 IST
1 / 10हे मंदिर तुर्कीचे प्राचीन शहर हेरापोलिसमध्ये आहे. असं म्हणतात जो या मंदीराच्या प्रवेशद्वारातून आत जातो तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही.2 / 10भयानक म्हणजे या मंदिरात त्या मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेहही सापडत नाही.3 / 10'सायन्स अलर्ट डॉट कॉम'नुसार मागील अनेक वर्षांत असे मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे या मंदिरात गेलेल्या पशुंचाही मृत्यू होत आहे.4 / 10या कारणामुळे हा नरकाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो.5 / 10या मंदिराबाबत लोकांची अशी समजुत आहे की या मंदिरातील युनानी देवतेच्या विषारी श्वासांमुळे हे मृत्यू होत आहेत.6 / 10ग्रीक रोमन काळात याबाबत एक कायदा बनवण्यात आला होता की जो कुणी या मंदिरात जाईल त्याचे मुंडके उडवण्यात येईल.7 / 10पण वैज्ञानिकांनी या रहस्यमय मृत्यंचे रहस्य उलगडले आहे.8 / 10वैज्ञानिकांच्या मते या मंदिराच्या खाली मोठ्याप्रमाणात कार्बन डायोक्साईड आहे त्यामुळे माणसांचा, पशु-पक्ष्यांचा तिथे गेल्यावर मृत्यू होतो.9 / 10या गुहेमध्ये ९१ टक्के कार्बन डायोक्साईड आहे जो तीस मिनिटात माणसाला मृत्यूच्या दाढेत ढकलु शकतो. 10 / 10याच मंदिराच्या गुबेतून येणाऱ्या वाफेच्या संपर्कात आलेले पशुपक्षीही यामुळेच दगावतात.