Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:40 IST
1 / 72 / 73 / 74 / 75 / 7इटलीने वेढलेला सॅन मारिनो हा जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे. हा देश त्याच्या जुन्या किल्ल्यांसाठी आणि समृद्ध इतिहासासाठी विशेष ओळखला जातो. इथल्या बहुतेक पर्यटन स्थळांवर प्रवेश विनामूल्य किंवा अगदी कमी शुल्कात उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चातही तुम्ही या देशाला भेट देऊ शकता.6 / 7स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या मध्ये वसलेला लिक्टेनस्टाइन हा एक छोटा, पण खूप सुंदर देश आहे. हा देश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, ऐतिहासिक वास्तूंसाठी आणि अनोख्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. इथेही तुम्ही कमी वेळेत संपूर्ण देश पाहू शकता.7 / 7प्रशांत महासागरात वसलेला नाउरू एक छोटासा बेट देश आहे आणि जगातील तिसरा सर्वात लहान देश आहे. हे एक शांत, साधं आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं बेट आहे. हा संपूर्ण देश तुम्ही फक्त ५-६ तासांत पायी किंवा सायकलने फिरू शकता.