1 / 11दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स या संस्थेमार्फत सुरक्षित देशांची यादी जाहीर करण्यात येते. ज्या देशाचा क्राईम रेट सर्वात कमी असेल तो देश सर्वात शांत आणि सुरक्षित मानला जातो. काही दिवसांपूर्वीच ग्लोबल पीस इंडेक्स 2018ची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये 163 देशांचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या देशांमध्ये जाण्याचा प्लॅन करू शकता.2 / 11ग्लोबल पीस इंडेक्समध्ये आईसलॅन्डला सर्वात सुरक्षित देश सांगण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, इथे जवळपास 3 लाख लोक राहतात आणि येथील क्राईम रेट हा 1.09 आहे.3 / 11न्यूझीलॅन्ड प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलिया स्थित एक देश आहे. हा दोन बेटांनी मिळून बनला आहे. येथील लोकसंख्या 47 लाख आहे, तर क्राईम रेट 1.192 आहे. 4 / 11ऑस्ट्रिया यूरोपमध्ये आहे. याची राजधानी व्हिएन्ना आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 87 लाख आहे. येथील क्राईम रेट 1.274 आहे.5 / 11पोर्तुगाल यूरोप खंडातील देश आहे. येथील लोकसंख्या 1 कोटी आहे. तर क्राईम रेट 1.318 आहे.6 / 11डेन्मार्क उत्तर यूरोपमधील देश असून येथील लोकसंख्या 53 लाख आहे. तर 1.35 इतका क्राईम रेट आहे. 7 / 11कॅनडा उत्तर अमेरिकेमध्ये असलेला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या 3.63 कोटी असून क्राईम रेट 1.372 आहे.8 / 11यूरोपमधील चेक रिपब्लिक देशाचाही या यादीत समावेश आहे. येथील लोकसंख्या 1 कोटी आहे. तर क्राईम रेट 1.381 आहे.9 / 11सिंगापूरची लोकसंख्या जवळपास 56 लाख आहे. तर क्राईम रेट 1.382 आहे.10 / 11जपानचाही या यादीत समावेश होत असून या देशाची लोकसंख्या जवळपास 12 कोटी आहे. तर 1.391 इतका क्राईम रेट आहे. 11 / 11आयरलॅन्डची लोकसंख्या 47 लाख आहे. क्राईम रेट 1.393 इतका आहे.