प्री वेडिंग फोटोशूट करायचंय, मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:21 IST
1 / 5कुफ्री एक छोटंसं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पर्वतीय भागात वसलेले आहे. शिमल्याच्या जवळ समुद्रतळापासून 2510 मीटर उंचावर असून, हिमाचल प्रदेशच्या दक्षिणी भागात स्थित आहे. प्री वेडिंग शूटसाठी अनेक जोडपी इथे येत असतात. 2 / 5चैल हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 2,250 मीटर उंचावर स्थित आहे. हिमाचल प्रदेश प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. क्रिकेट प्रेमींमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. 3 / 5शिमल्यातलं चाडविक फॉल्स हेसुद्धा फोटोसेशनसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाचं अद्भुत सौंदर्य इथे पाहायला मिळते. प्री वेडिंग शूटसाठीही हे ठिकाण बेस्ट आहे. 4 / 5नालदेहरा हिमाचल प्रदेश राज्य में स्थित पर्यटनस्थळ असून, समुद्रतळापासून 2044 मीटर उंचावर स्थित आहे. या ठिकाणाचं नाव दोन शहरं मिळून तयार होतात. शहराचं नाव 'नाग' आणि 'देहरा' दोन शब्दांचं मिळून तयार झालं आहे. प्री वेडिंग शूटसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 5 / 5रोथनी कॅसल हे ठिकाण ब्रिटिशांच्या कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. या ठिकाणी इंग्रजांनी पहिल्यांदा लोकवस्ती वसवलेली होती. त्यामुळे तिथे आताही ब्रिटिशकालीन इमारती पाहायला मिळतात. प्री वेडिंग शूटसाठी हे ठिकाणही मस्त आहे.