एक नंबर ना राव! देशातलंच नव्हे, आशियातलं सर्वात स्वच्छ गाव By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:32 PM
1 / 8 मेघालयातलं मावल्यान्नाँग देशातलंच नव्हे, तर आशियातलं सर्वात स्वच्छ गाव आहे. 2 / 8 आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मावल्यान्नाँगला पुरस्कार मिळाला आहे. 3 / 8 विशेष म्हणजे मावल्यान्नाँग गावची साक्षरता १०० टक्के आहे. या गावातली अनेक मंडळी अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात. 4 / 8 या गावात अनेक सुंदर झरे आहेत. झाडांच्या मुळापासून तयार झालेला पूल हे मावल्यान्नाँगचं वैशिष्ट्य. 5 / 8 मावल्यान्नाँगचे ग्रामस्थ कचऱ्यापासून खत तयार करुन त्याचा सदुपयोग करतात. 6 / 8 जवळ कचराकुंडी नव्हती म्हणून रस्त्यावर कचरा टाकला, असं कारण कोणीही सांगू नये यासाठी गावातल्या रस्त्यांवर ठराविक अंतरावर कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. 7 / 8 २००३ मध्ये मावल्यान्नाँगला आशियातल्या सर्वात सुंदर गावाचा पुरस्कार मिळाला. 8 / 8 २००५ मध्ये देशातलं सर्वात गाव म्हणून सरकारनं मावल्यान्नाँगला पुरस्कारनं गौरवलं. आणखी वाचा