शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजबच! उन्हाळ्याची चाहूल लागताच या हॉटेलची बनते नदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 7:48 PM

1 / 7
जगभरामध्ये अनेक अशा कलाकृती आहेत ज्या आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. पण अनेक अशा कलाकृतीही आहेत ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. असचं एक हॉटेल आहे, जे आपल्या हटके अंदाजासोबतच सर्वांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे हॉटेल असं आहे जे वसंत ऋतूमध्ये वितळून नदी होतं. गोंधळलात ना?
2 / 7
वितळणारं हे हॉटेल स्वीडनमध्ये असून जे दरवर्षी थंडीमध्ये बर्फाच्या सहाय्याने तयार करण्यात येतं आणि वसंत ऋतूमध्ये वितळून नदी होतं. हे हॉटेल टॉर्न नदीवर तयार करण्यात येतं.
3 / 7
स्वीडनमधील या आइस हॉटेलमध्ये 13 देशांमधील 14 आर्टीस्ट आणि डिझायनर्सनी जवळपास 15 नव्या खोल्या तयार केल्या होत्या. दरम्यान 2016मध्ये या हॉटेलचा काही भाग स्थायी स्वरूपात तयार करण्यात आला असून असं करण्यासाठी सोलार पॉवर कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला.
4 / 7
बर्फाने तयार करण्यात येणारं हे हॉटेल पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. हे हॉटे पहिल्यांदा 1992मध्ये ओपन करण्यात आलं होतं. आणि यामध्ये स्नो आणि आइसपासून तयार करण्यात आलेलं कॉम्प्लॅक्स, रेस्टॉरंट, सेरेमनी हॉल सारख्या अनेक गोष्टी आहेत.
5 / 7
बर्फाने तयार करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये लिविंग ओशन स्वीटसुद्धा आहे. जे इग्लंडचे डिझायनर जोनाथन ग्रीन यांनी तयार केलं आहे. या स्वीटमध्ये कोरल आणि फिश आहेत. जे या स्वीटचं सौंदर्य खुलवण्याचं काम करतात.
6 / 7
हे हॉटेल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो टूरिस्ट येत असतात. यावर्षी 13 एप्रिलपर्यंत हे हॉटेल पर्यटकांसाठी खुल करण्यात आलं आहे. मग उशीर का करताय? तुम्हीही हे हॉटेल पाहण्यासाठी बुकिंग करू शकता.
7 / 7
हे हॉटेल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो टूरिस्ट येत असतात. यावर्षी 13 एप्रिलपर्यंत हे हॉटेल पर्यटकांसाठी खुल करण्यात आलं आहे. मग उशीर का करताय? तुम्हीही हे हॉटेल पाहण्यासाठी बुकिंग करू शकता.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनInternationalआंतरराष्ट्रीय