शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावर जा आता सुखरूप, खोरा बंदरातील नवीन जेट्टीवरून सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:14 IST

1 / 7
आगरदांडा : जीव धोक्यात घालून समुद्रातील जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
2 / 7
येथील खोरा बंदरातील नवीन जेट्टीचे काम पूर्ण झाले असून दोन दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर येथून बोटसेवा सुरू केली आहे.
3 / 7
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत सुमारे ११० कोटी रुपये खर्च करून समुद्राच्या आत तीन मीटर लांब व पाच मीटर रुंदीचा घेर असणारी ही मोठी जेट्टी दोन वर्षांत पूर्ण करण्यात आली आहे.
4 / 7
सध्या जेट्टीचे संरक्षक लोखंडी पाइप यांना कलर करणे त्याचप्रमाणे इतर रंगरंगोटीचे काम शिल्लक आहेत. खोरा बंदरातील जुनी जेट्टी ही धोकादायक झाली होती.
5 / 7
ओहटी वेळी बोटी किनाऱ्यावर लागणे खूप जिकीरीचे व त्रासाचे होत होते. भरतीची वाट पाहत बोटी समुद्रात तासन् तास खोळंबत होत्या. यासाठी या नवीन जेट्टीचा प्रस्ताव करण्यात आला होता. नवीन जेट्टीमुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहणे अगदी सुलभ होणार आहे.
6 / 7
ही बोटचालकांनी तक्रार केली आहे. जेट्टीवर बोट लागताना त्रास होत आहे, तर बोट थांबत नाही. त्याकरिता आणखी ब्रेकर वॉटरची मागणी बोटचालकांनी केली आहे. बोटचालकांना तुम्ही नियमित प्रवास करा, त्याच अडचणी आल्या, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे मेरी टाइम बोर्डाचे उपअभियंता दीपक पवार यांनी सांगितले.
7 / 7
कोटखोरा बंदरात नवीन जेट्टी प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसांपासून सुरू केली आहे. बोटचालक व पर्यटकांना या सेवेतून काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करून ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दीपक पवार यांनी दिली.
टॅग्स :tourismपर्यटनalibaugअलिबागRaigadरायगड