काय सांगता! भारतातल्या 'या' ठिकाणी मुलींना जिन्स घालण्यापासून रोखलं जातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 17:50 IST
1 / 9महिलांच्या पेहरावाबाबत भारतात पुर्वीपासूनच अनेक वादविवाद होते. पण सध्याच्या काळत मुली वेस्टन कल्चरनुसार आपलं ड्रेसिंग करत असतात. फार क्वचीत मुली अशा आहेत. ज्या दररोज भारतीय संस्कृतीप्रमाणे पेहराव करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी मुलींना जीन्स घालण्यापासून अडवलं जातं. त्याठिकाणी मुलींना जीन्स घालण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. 2 / 9हरीयाणाच्या महिला व बाल विभागात एक वेगळाच प्रकार बघायला मिळतो, येथील फिल्डवर काम करणाऱ्या महिलांना सभ्य कपडे घालण्याची ताकीद देण्यात आली आहे.3 / 9श्रीनगरमध्ये तर फक्त स्थानिकच नव्हे तर महिला पर्यटकांना देखील ‘योग्य परिधान आचारण’ अंतर्गत राहावे लागते. जमात-ए-इस्लामी काश्मिर या स्थानिक धार्मिक संघटनेने असे सुचवले आहे की, जम्मू-काश्मीरला येणाऱ्या स्त्रियांना अशी वस्त्रे घालणे म्हणजे स्थानिक संवेदनांबाबत असंवेदनशील असणे आहे.4 / 9 हे हरीयाणाचे आदर्श मुलींचे महाविद्यालय असून लहान ड्रेस घातल्याने विद्यार्थिनी पूर्णपणे झाकल्या जात नाही त्यामुळे त्यांना छेडखाणीला सामोरे जावे लागते.” असं तिथल्या शिक्षकांचे मत आहे. त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये पाश्चिमात्य कपडे घालण्यास मनाई आहे. आणि जर कुणी हा नियम मोडला तर त्याला १०० रुपयांचा दंड भरावा लागतो.5 / 9चेन्नईतील साईराम कॉलेज या इंजिनीअरिंग कॉलेजात देखील मुलींनी काय घालावे आणि काय घालू नये ह्यासंबधीचे नियम बनविण्यात आले आहेत.6 / 9थिरुवल्लुवर येथील आरडीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ह्या कॉलेजात तर गेस्ट लेक्चर घेणाऱ्या लेक्चरला देखील कपड्यांबाबतचे हे नियम पाळावे लागतात.7 / 9राजस्थान येथील बारमेर येथे तर फक्त जीन्स घालणेच नाही तर मुलींचे मोबाईल फोन्स वापरणे देखील बॅन आहे8 / 9 उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनग्रास आणि हारनपुस जिल्ह्यातील पश्चिम बंगालमधील किमान १० गावांत पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.9 / 9तामिळनाडूतील हे मंदीर धार्मिक सभ्यतेच्या अंतर्गत येत असल्याने ह्यावर आपण कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. तर मद्रास उच्च न्यायालयाने येथील मंदिरात जीन्स, तसेच छोटे कपडे घालून जाण्यास मनाई केली आहे. येथील अरुल्मिगु रामनथ स्वामी मंदिरात अनेक पर्यटक भेट देतात तेव्हा जर कुठलाही पर्यटक हा धोती, पायजामा किंवा फॉर्मल शर्ट-पँटमध्ये नसेल तसेच जर स्त्री ही साडीत नसेल तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.