शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कामाच्या धकाधकीतून विरंगुळ्यासाठी कुन्नूर आहे बेस्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:27 PM

1 / 5
नीलगिरी माऊंटन रेल्वे- तामिळनाडूमध्ये कुन्नूरहून ऊटीपर्यंत चालणाऱ्या टॉय ट्रेनमधून निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं. ही ट्रेन डोंगर रांगातून जात असून, निसर्गाचं विलोभनीय दृश्य नजरेस पडतं.
2 / 5
डॉल्फिन्स नोज- कुन्नूर प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक आहे. मुख्य शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. दाट जंगल, हिरवळ आणि डोंगरातील नयनरम्य चित्र इथे दिसून येते.
3 / 5
लेडी कॅनिंग्स सीट- नीलगिरीच्या डोंगरांमध्येही सुंदर नजारे पाहायला मिळतात. इथे चहाचे मोठ मोठे मळे आहेत. जिथे तुम्हाला बऱ्यापैकी हिरवळ दिसते. इथे आपल्याला शांती मिळेल. शहरातल्या धकाधकीच्या जीवनात थोड्याशा विरंगुळ्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
4 / 5
राली बांध- ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. इथे येण्यासाठी जंगलातून मार्गक्रमण करावं लागतं. त्यामुळे निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याची झलक पाहायला मिळते.
5 / 5
सिम्स पार्क- कुन्नूरचे प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटमधील एक सिम्स पार्कमध्ये प्रसिद्ध बॉटेनिकल गार्डन आहे. इथे आपल्याला फार सुंदर फुलं दिसतात. 12 एकरमध्ये हे गार्डन पसरलेलं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे गार्डन खुलं असतं.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स