शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समर व्हेकेशनमध्ये फिरण्यासाठी 'या' डेस्टिनेशन्सची निवड करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:29 PM

1 / 6
जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून समर व्हेकेशनमध्ये फिरण्यासाठी डेस्टिनेशन शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन सुचवू शकतो. रोजची दगदग आणि नकोसा करणारा उन्हाळ्यापासून काही वेळ शांतता आणि मनाला थंडावा देणाऱ्या या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत प्लॅन करू शकता.
2 / 6
हिमाचल प्रदेशमधील कांगडामध्ये असलेलं हिल स्टेशन धर्मशाळा, दिल्लीपासून 486 किमी अंतरावर स्थित आहे. हे हिमाचलमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. कपल्ससाठी हे ठिकाण बेस्ट आहे. याशिवाय तुम्ही येथे कुटुंबासोबतही जाऊ शकता.
3 / 6
नैनीताल सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. तुमच्याकडे फक्त दोन दिवस असतील आणि तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हे बेस्ट ऑप्शन आहे.
4 / 6
उत्तराखंडमधील आणखी एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे, मसूरी. केम्प्टी फॉल्स, धनोल्टी यांसारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
5 / 6
अल्मोडाला उत्तराखंडमधील कुमाउ रीजनमधील कल्चरल हार्ट मानलं जातं. अशातच जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर अल्मोडा एक उत्तम पर्याय आहे.
6 / 6
हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये स्थित असलेलं हे हिल स्टेशन पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करत असतं. मंकी पॉइंट, लोअर अॅन्ड अपर मॉल, बाबा बालक नाथ टेंपल येथील मुख्य आकर्षणं आहेत.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनSummer Specialसमर स्पेशल